Indian Army Yoga Video: 10 व्या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त भारतीय लष्करी जवान योगासने करण्यास सज्ज (Watch Video)

10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त भारत देशाचे लष्कराचे जवानही हा खास दिवस साजरा करण्यास सज्ज झाले आहे.

Indian Army Yoga Video: PC TWITTER

Indian Army Yoga Video:  आज आंतरराष्ट्रीय योग  (International Yoga Day) दिवस ठिकठिकाणी साजरा केला जात आहे. 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त भारत देशाचे लष्कराचे जवानही हा खास दिवस साजरा करण्यास सज्ज झाले आहे. वाळवंटातील उष्मा असो वा कच्छच्या रणची उजाड भूमी किंवा सीमेवर थंडगार वाऱ्याचा सामना करत आपले शूर वीर सैनिक योगासने करताना दिसत आहे. शरिराला आणि मनाला नव्या उर्जा देण्यासाठी मोठ्या उत्साहाने योगा दिवस साजरा करत आहे. (हेही वाचा- जागतिक योगा दिन दिवशी PM Narendra Modi यांचा Sher-i-Kashmir International Conference Centre मध्ये योगा डे उपक्रमात सहभाग!)

योगा दिवसानिमित्त देशाच्या विविध भागात तैनात असलेल्या लष्करी अधिकारी योगासने करत आहे. वाळवंटात उभे राहून योगासने करताना सैनिकांच्या चेहऱ्यावर एक विशेष चमक दिसत होती. कच्छच्या रणात योगा करताना सैनिकांनी योगाच्या माध्यमातून लोकांना प्रेरणा दिली आहे. आरोग्य आणि शक्तीचा संदेश दिला आहे. देशाच्या उत्तर सीमेवर भारतीय जवानांची बर्फाच्छादीत डोंगर रागांमध्ये योगासनाचे फोटो व्हायरल होत आहे.

 

सीमेवर तैनात असलेल्या जवानांनी थंड वाऱ्यात योगासने करत प्रत्येक परिस्थितीत योग कसा मदत करतो हे दाखवून दिले. लष्करी जवानांचे योगासनांचे समर्पण ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. यावरून असे दिसून येते की योग हे केवळ शरीर आणि मन निरोगी ठेवण्याचे साधन नाही तर कठीण प्रसंगांना सहन करण्याची शक्ती आणि शक्ती देखील देते.

आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 रोजी उत्तर सीमेवरील हिमशिखरांवर योगाचा सराव करताना भारतीय लष्कराचे सैनिक

एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगा दिना निमित्त Sher-i-Kashmir International Conference Centre मध्ये आयोजित उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला आणि योग साधना पूर्ण केली.