G20 Summit: भारत पुढील 20 वर्षात विकसित राष्ट्र होईल; G20 शिखर परिषदेपूर्वी पंतप्रधान मोदींचा भविष्यवेधी दावा

या खास मुलाखतीत पीएम मोदींनी G20 शिखर परिषद, दहशतवाद, भ्रष्टाचार आणि अर्थव्यवस्था यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यादरम्यान त्यांनी चीन-पाकचे आक्षेप फेटाळून लावले, ज्यात त्यांनी अरुणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये जी-20 संबंधित बैठकांच्या आयोजनावर प्रश्न उपस्थित केले.

PM Modi (PC - ANI)

G20 Summit: पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जी-20 परिषद, रशिया युक्रेन युद्ध, भारतातील भ्रष्टाचार, जातिवाद आणि जातीयवाद यावर चर्चा केली. काश्मीर, अरुणाचलमध्ये G-20 बैठकीवर पाकिस्तान आणि चीनचा आक्षेप पंतप्रधान मोदींनी खोडून काढला. ते म्हणाले की, देशाच्या प्रत्येक भागात सभा घेणे स्वाभाविक आहे. G-20 परिषदेपूर्वी त्यांची मुलाखत जगाला संदेश देणारी मानली जात आहे. यावेळी अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि येत्या 20 वर्षांत भारत एक विकसित राष्ट्र बनेल. गेल्या काही वर्षांत भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत माहिती तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे. या गतीने विकास होत राहिल्यास देश भारत आपल्या मजबूत अर्थव्यवस्थेच्या जोरावर येत्या 20 वर्षांत एक विकसित राष्ट्र बनेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत हा एक अब्ज भुकेल्या पोटांचा देश म्हणून पाहिला जात होता, आता तो एक अब्ज महत्त्वाकांक्षी मनांचा आणि दोन अब्ज कुशल हातांचा देश आहे. जगाचा जीडीपी-केंद्रित दृष्टिकोन होता तो आता मानव-केंद्रित दृष्टिकोनात बदलत आहे. यामध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. 'सबका साथ, सबका विकास' हे जगाच्या कल्याणासाठी मार्गदर्शक तत्त्वही ठरू शकते, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. या खास मुलाखतीत पीएम मोदींनी G20 शिखर परिषद, दहशतवाद, भ्रष्टाचार आणि अर्थव्यवस्था यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यादरम्यान त्यांनी चीन-पाकचे आक्षेप फेटाळून लावले, ज्यात त्यांनी अरुणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये जी-20 संबंधित बैठकांच्या आयोजनावर प्रश्न उपस्थित केले. (हेही वाचा - Udhayanidhi Stalin On Sanatana Dharma: 'सनातन धर्म डेंग्यू, मलेरियासारखा', एम के स्टॅलिन यांचे चिरंजीव उदयनिधी यांचे वक्तव्य)

मुलाखतीदरम्यान, बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताच्या G20 अध्यक्षपदाचे अनेक सकारात्मक परिणाम झाले आहेत. भारताने जागतिक स्तरावर मजबूत नेतृत्वाची भूमिका स्वीकारली आहे. भारत यंदाच्या शिखर परिषदेत महत्त्वाची भूमिका बजावेल. भारत जागतिक अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि हवामान बदलाशी लढण्यासाठी G20 च्या माध्यमातून काम करेल. G20 च्या माध्यमातून आर्थिक सुधारणा, हवामान बदल, दहशतवादाशी लढा, डिजिटलायझेशन आणि आरोग्य यासारख्या महत्त्वाच्या बाबींवर भारत काम करत आहे.

दहशतवाद आणि भष्ट्राचारावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत, भारत सरकार काही पावले उचलत आहे, ज्यात दहशतवाद्यांविरोधात कारवाई करणे, दहशतवादी संघटनांना मिळणारा निधी संपवणे आणि दहशतवादाच्या कल्पना पसरवण्याविरुद्ध जनजागृती करणे यासह काही पावले उचलली जात आहेत. भ्रष्टाचाराबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही भारताची मोठी समस्या आहे. भ्रष्टाचार संपवण्यासाठी सरकार कठोर पावले उचलत आहे. भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.