एक राऊंड 36 वार: भारत-रशिया S-400 खरेदी करार: काय आहेत वैशिष्ट्ये?

उभय देशात हा करार होऊ नये यासाठी अमेरिकेकडून दोन्ही देशांवर मोठा दबाव होता.

एस-४०० एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिम (प्रतिकात्मक प्रतिमा) (Photo: tvc.ru)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या द्विपक्षीय चर्चा सुरु आहे. दरम्यान, वृत्त आले आहे की, भारत-रशिया यांच्या S-400 खरेदी करारावर शिक्कामोर्तब झाले. S-400 एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिम करार हा दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या भेटीतील महत्त्वाचा घटक होता. उभय देशात हा करार होऊ नये यासाठी अमेरिकेकडून दोन्ही देशांवर मोठा दबाव होता. पण, अमेरिकेच्या दबावाला धुडकावून लावत भारताने रशियासोबत हा करार केलाच. दरम्यान, या कराराची किंमत म्हणून अमेरिका भारतावर अनेक निर्बंध घालण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय आहे एस-४०० एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिम ?

ही एक S-400 एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिम आहे. जी शत्रूचे एअरक्राफ्ट आकाशातून खाली पाडू शकते. S-400 एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिमला रशियातील सर्वा अत्याधुनिक लॉन्ग रेंज सर्फेस-टु-एअर मिसाईल डिफेन्स सिस्टम म्हणून ओळखले जाते. ही सिस्टम शत्रूच्या क्रूज, एअरक्राफ्ट आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना टिपण्यातही सक्षम आहे. ही सिस्टम रशियाच्याच S-३०० मिसाईल सिस्टमचा आधुनिक आवतार आहे. ही क्षेपणास्त्र सिस्टम अल्माज-आंतेने तयार केली आहे. रशियामध्ये ही सिस्टम २००७ पासून कार्यन्वीत आहे. या सिस्टमची खासीयत अशी की, एकाच राऊंडमध्ये ३६ वेळा वार करण्याची क्षमता आहे. (हेही वाचा, भारत, रशियामध्ये S-400डील; अमेरिकेला चिंता, कारण..)

वायुसेनेसाठी 'बूष्टर शॉट'

एअर चीफ बीएस धनोआ यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार S-400 एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिम भारतीय वायुसेनेसाठी 'बूष्टर शॉट' ठरेण. शेजारी राष्ट्रांकडून भारताला असलेला संभाव्य आणि सततचा धोका लक्षात घेता ही सिस्टम भारतासाठी आवश्यकच होती.

शेजारी राष्ट्र पाकिस्तानचा विचार करता त्या देशाजवळ अपग्रेडेड एफ-१६युक्त २० फायटर सक्वेट्रन्स आहेत. याशिवाय चीनजवळ J-17 ची संख्याही मोठी आहे. चीनजवळ 1,700 फाइटर आहेत. ज्यात 800 4-जेनरेशन फाइटरचाही समावेश आहे.