Lok Sabha Election Results 2019: राहुल गांधी, दिग्विजय सिंह, अशोक चव्हाण यांच्यासह देशभरातील 'या' दिग्गजांचे धक्कादायक पराभव; विजय आणि मताधिक्य जाणून घ्या एका क्लिकवर

एक्झिट पोल नंतर भाजप सत्तेत येईल हे निश्चित झाले होते, मात्र इतक्या जास्त मतांनी विजय मिळेल हे अनपेक्षित होते. राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांना हा फार मोठा धक्का आहे. चला पाहूया या मोदी लाटेचा फटका कोणत्या नेत्यांना बसला आहे

या दिग्गजांचा झाला पराभव (File Photo)

आज संध्याकाळपर्यंत लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजप (BJP) 346, कॉंग्रेस (Congress) 86 आणि इतर पक्षांना 108 जागा मिळाल्या आहेत. महत्वाचे म्हणजे 2014 सालापेक्षा अधिक यश भाजपला मिळाले आहे, तर कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. एक्झिट पोल नंतर भाजप सत्तेत येईल हे निश्चित झाले होते, मात्र इतक्या जास्त मतांनी विजय मिळेल हे अनपेक्षित होते. राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांना हा फार मोठा धक्का आहे. चला पाहूया या मोदी लाटेचा फटका कोणत्या नेत्यांना बसला आहे.

  • राहुल गांधी (अमेठी) -

यावेळी प्रथमच राहुल गांधी यांनी अमेठी (Amethi) आणि वायनाड इथून उमेदवारी अर्ज भरले होते. वायनाड येथे राहुल गांधी यांना दणदणीत विजय प्राप्त झाला, मात्र अमेठीमध्ये तितकाच दारूण पराभव. अमेठी येथे भाजपच्या स्मृती इराणी (Smriti Irani)  4,010,46 मतांनी विजयी ठरल्या आहेत.

  • चंद्राबाबू नायडू –

आंध्रप्रदेश मध्ये लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांची मतमोजणी पार पडत आहेत. यामध्ये आंध्राचे सध्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांचा वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी (Jaganmohan Reddy) यांनी दारूण पराभव केला आहे. तेच आंध्राचे नवे मुख्यमंत्री होतील हे जवळजवळ निश्चित झाले आहे.

  • दिग्विजय सिंह (भोपाळ) –

निवडणुकांच्या अवघ्या काही दिवस आधी भाजपने भोपाळ येथून वादग्रस्त साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) यांना उमेदवारी दिली. त्यानंतर साध्वी यांनी केलेली वक्त्यव्ये यांमुळे त्यांना अनेकांच्या टीकेचा सामना करावा लागला होता. भोपाल यथे दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) यांचा विजय जवळजवळ निश्चित असताना प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मुसंडी मारत भाजपला विजय मिळवून दिला आहे.

  • अशोक चव्हाण (नांदेड) –

कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड मधून पहिलाच पराभव वाट्याला आला आहे.

(हेही वाचा: पार्थ पवार, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अनंत गिते, राजू शेट्टी यांची कुणी घेतली विकेट? पाहा कोण ठरले महाराष्ट्राचे जायंट किलर)

  • मल्लिकार्जुन खर्गे (गुलबर्गा) –

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) गुलबर्गा येथील जागा लढवत होते. त्यांच्यासमोर भाजपने उमेश जाधव यांचे आव्हान उभे केले होते. आश्चर्य  म्हणजे उमेश जाधव तब्बल 10 हजार मतांनी पुढे आहेत. कॉंग्रेससाठी कर्नाटकमधील हा फार मोठा पराभव ठरला आहे.

  • जया प्रदा (रामपूर) –

तीन वेळा पक्ष बदलून शेवटी जया प्रदा (Jaya Prada) भाजपमध्ये सामील झाल्या. त्यांच्यासमोर सध्या आझम खान यांचे आव्हान आहे. प्रचारादरम्यान झालेले आरोप प्रत्यारोप, टीका यानंतर सध्या हाती आलेल्या निकालानुसार आझम खान आघाडीवर आहेत.

(देशात सध्या कोणाची आघाडी आहे, कोण किती मतांनी जिंकले आहे हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा)

  • शत्रुघ्न सिन्हा (पटना साहिब) –

निवडणुकीच्या तोंडावर शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी भाजप पक्षाला राम राम ठोकून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सध्या त्यांच्यासमोर भाजपचे रविशंकर प्रसाद उभे ठाकले आहेत. सध्याची आकडेवारी पाहता रविशंकर तब्बल 28 हजार मतांनी पुढे आहेत. त्यामुळे कॉंग्रेसला या सेलिब्रिटी चेहऱ्याचा काहीच फायदा झाला नाही हे निश्चित.

  • ज्योतिरादित्य सिंदिया (गुना) –

विधानसभा निवडणुकीवेळी मध्य प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करूनही कॉंग्रेसची लोकसभेची कामगिरी अतिशय खराब ठरली आहे. भाजपचे के.पी.यादव हे ज्योतिरादित्य सिंदिया (Jyotiraditya Scindia) यांच्यापेक्षा 13 हजार मतांनी पुढे आहेत. मध्य प्रदेशमध्ये फक्त कमलनाथ यांचा मुलगा नकुल नाथ यानेच काही कामगिरी केली आहे.

यावेळची निवडणूक पश्चिम बंगाल राज्यासाठी फार महत्वाची ठरली. मागच्यावेळी फक्त दोन जागा जिंकलेला भाजप सध्या 19 जागांवर आघाडीवर आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now