Jharkhand Shocker: झारखंडमधील पश्चिम सिंगभूममध्ये क्रूरतेच्या सर्व सीमा पार; 10 नराधमांनी सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीवर केला सामूहिक बलात्कार
पोलिस अधीक्षक आशुतोष शेखर यांनी सांगितले की, मुफसिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेत सहभागी असलेल्या लोकांची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू आहे.
Jharkhand Shocker: झारखंडच्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यात सुमारे 10 जणांनी एका 26 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरवर बलात्कार केला. पोलिसांनी शनिवारी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ही महिला सध्या घरून काम करत होती. गुरुवारी संध्याकाळी ती तिच्या प्रियकरासोबत दुचाकीवरून जात असताना चाईबासा येथील जुन्या विमानतळाजवळ ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, आठ-दहा जणांच्या टोळक्याने दोघांना अडवले. प्रियकराला मारहाण केली आणि मुलीला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
पोलिस अधीक्षक आशुतोष शेखर यांनी सांगितले की, मुफसिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेत सहभागी असलेल्या लोकांची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू आहे. (हेही वाचा - Rewa Accident: रीवामध्ये भीषण अपघात; बस आणि ट्रकच्या धडकेत 14 जणांचा मृत्यू, 40 हून अधिक जखमी)
पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणी एका नामांकित आयटी कंपनीत काम करते. तिला तेथे सोडून आरोपी पळून गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तिची पर्स आणि मोबाईल फोनही हिसकावून घेतला. मुलगी कशीतरी घरी पोहोचली आणि घडलेला प्रकार घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
दरम्यान, याच महिन्यात लोहरदगा येथे एका विधवा महिलेसोबत सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली होती. सेरेंगडागमध्ये असलेल्या पोलिस पिकेटमधील दोन जवानांवर बलात्काराचा आरोप लावण्यात आला होता. अत्यंत गंभीर अवस्थेत पीडितेला लोहरदगा सदर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
डोंगराळ भागात राहणारी एक महिला शेतात गवत कापण्यासाठी गेली होती. यादरम्यान 2 मद्यधुंद लोकांनी त्याला वासनेची शिकार बनवले. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, दोन्ही आरोपी स्थानिक पोलिसांच्या पिकेटचे शिपाई होते.