Punjab University Approves Menstrual Leave: पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थिनींना मासिक पाळी दरम्यान मिळणार सुटी; विद्यापीठाकडून प्रस्तावाला मंजुरी
या योजनेंतर्गत मुलींना एका महिन्यात एक मासिक पाळीची रजा घेता येणार आहे. या रजा सत्र 2024-25 मध्ये घेता येतील. मुली एका वर्षाच्या सत्रात म्हणजे दोन सेमिस्टरमध्ये एकूण 8 रजा घेऊ शकतील.
Punjab University Approves Menstrual Leave: मुलींना/महिलांना मासिक पाळी (Menstrual Cycle) दरम्यान रजा मिळावी की, नाही या मुद्द्यावर बराच काळ वाद सुरू आहे. काही त्याच्या बाजूने बोलतात, तर काही विरोधात. मात्र, पंजाबच्या लोकांनी या विषयाबाबतील सकारात्मक निर्णय घेतला आहे. वास्तविक, पंजाब युनिव्हर्सिटी व्यवस्थापनाने मुलींना मासिक पाळीदरम्यान सुटी देण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. या अधिसूचनेसंदर्भात पंजाब युनिव्हर्सिटी व्यवस्थापनाच्या वतीने विभागीय संस्था केंद्र आणि ग्रामीण केंद्राचे अध्यक्ष, संचालक आणि समन्वयकांना पत्रे पाठवण्यात आली आहेत.
एका महिन्यात एक मासिक पाळीची रजा मिळणार -
पंजाब युनिव्हर्सिटी (PU) मध्ये विद्यार्थिनींना एका सेमिस्टरमध्ये 4 मासिक पाळी रजा मिळतील. या योजनेंतर्गत मुलींना एका महिन्यात एक मासिक पाळीची रजा घेता येणार आहे. या रजा सत्र 2024-25 मध्ये घेता येतील. मुली एका वर्षाच्या सत्रात म्हणजे दोन सेमिस्टरमध्ये एकूण 8 रजा घेऊ शकतील. (हेही वाचा -Suicide Due to Menstrual Cycle Pain: मासिक पाळीच्या वेदना असहाय्य, अल्पवयीन मुलीची आत्महत्या; मुंबई येथील घटना)
कोणत्या निकषांवर रजा दिली जाईल?
विद्यार्थी परिषदेचे सचिव दीपक गोयत यांनी पी.यू. व्यवस्थापनाने प्रस्ताव पास केला आहे, त्याचा विद्यार्थिनींना मोठा फायदा होणार आहे. मुलींना एका वर्षाच्या सत्रात म्हणजे दोन सेमिस्टरमध्ये एकूण 8 रजा घेता येतील. मात्र ही रजा घेण्यासाठी निकष तयार करण्यात आले आहेत. ज्यांची उपस्थिती 75 टक्क्यांपेक्षा जास्त असेल त्यांनाच ही रजा मिळणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याची उपस्थिती 75 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास 10 टक्के उपस्थिती देण्याचा अधिकार PU व्यवस्थापनाकडे असणार आहे. म्हणूनच मुलींना मासिक रजा दिली जाईल की नाही हे त्यांच्या उपस्थितीवर अवलंबून आहे. (वाचा -Maharashtra Women's Policy 2024: महिला धोरण जाहीर! मासिक पाळीच्या दिवसांत 'या' महिलांना मिळणार पगारी सुट्टी)
जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ही रजा परीक्षेच्या दिवसांमध्ये दिली जाणार नाही. मग ती अंतर्गत परीक्षा असो किंवा बाह्य परीक्षा. याशिवाय प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळीही ही रजा दिली जाणार नाही. ही रजा कॉलेजचे अध्यक्ष आणि संचालक देणार आहेत. रजा घेण्यासाठी विद्यार्थिनींना स्व-प्रमाणपत्र द्यावे लागेल आणि त्यानंतर रजा घेतल्यानंतर त्यांना कामाच्या पाच दिवसांत फॉर्म भरावा लागेल.
कौन्सिल स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष जतिंदर सिंग आणि जॉइंट सेक्रेटरी यांनी पीरियड्स दरम्यान प्रति सेमिस्टर 12 सुट्ट्या लागू करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता, ज्यावर अनेक वेळा बैठका झाल्या. या बैठकांमध्ये परिषदेच्या काही प्राध्यापक, महिला उपाध्यक्षा आणि सचिवांचा निषेध दिसून आला. त्याचबरोबर अनेक महिला प्राध्यापिकांनी रजेच्या गरजेवर असहमती व्यक्त केली होती, तर काहींनी या निर्णयाचे समर्थनही केले होते. आता अखेर पी.यू. व्यवस्थापनाने हा प्रस्ताव मान्य केला आहे.