दोन पाद्र्यांचा भाजपमध्ये प्रवेश

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पादऱ्यांमध्ये 'जॅकबाईट सीरियन चर्च'चे पादरी फादर जीवर्गीज किझाक्केदथ आणि फादर थॉमस कुलाथुक्कल आणि एक डेकॉन एण्ड्र्यूज मंगलाथ यांचा समावेश आहे.

बीजेपी लोगो - झेंडा (Photo Credits: PTI)

डाव्यांचा गढ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळमध्ये सध्या एक प्रभावी घटना पहायला मिळाली आहे. बहुसंख्येने ख्रिश्चनधर्मिय असलेल्या या राज्यात दोन पाद्र्यांनी आणि एका डेकॉनने भारतीय जनता पक्षात शनिवारी प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या  पाद्र्यांमध्ये 'जॅकबाईट सीरियन चर्च'चे पादरी फादर जीवर्गीज किझाक्केदथ आणि फादर थॉमस कुलाथुक्कल आणि एक डेकॉन एण्ड्र्यूज मंगलाथ यांचा समावेश आहे.

डेकॉन चर्चमध्ये विविध विषयांवर काम करणाऱ्या समितीचे सदस्य होते. या तिघांनीही भाजपचे केरळमधील प्रदेशाध्यक्ष पीएस श्रीधरन पिल्लई यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. ख्रिश्चन बहुसंख्याक असलेल्या राज्यात भाजपसारख्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पक्षात  पाद्र्यांचा समावेश होणे हा केरळच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

महत्त्वपूर्ण असे की, भाजपमध्ये सहभागी होण्यापूर्वी या दोन्ही  पाद्र्यांनी 'सीरियन जॅकेबाईट चर्चचे बिशप थॉमस मोर थिमोथियोस'यांच्याशी चर्चा केली आणि त्यांची परवानगीही घेतली. उल्लेखनिय असे की, जॅकेबाईट सीरियन ऑर्थोडॉक्स हेच पुढे चर्चचे कॅथोलिक बनतात. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तात थॉमस मोर थिमोथियोस यांनी याबाबत म्हटले आहे की, 'जॅकेबाईट चर्च आपल्या कोणत्याही  पाद्र्यांच्या राजकीय स्वातंत्र्यावर बंधने आणत नाही. तो कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थन करण्यास स्वतंत्र आहे.'

दरम्यान,  पाद्र्यांनी कुलाथुक्कल यांनी म्हटले आहे की, ही एक सुरुवात आहे. नजीकच्या काळात अनेक  पाद्र्यीभाजपमध्ये प्रवेश करतील.