एक रुपयाच्या वसुलीसाठी, ८५ रुपयांची नोटीस; बँकेचा चोख कारभार, ९ कोटी बुडवून विजय माल्या मोकाट

होय, या बँकेने एक रुपया वसूल करण्यासाठी चक्क ८५ रुपये खर्च करुन ग्राहकाला नोटीस पाठवली आहे.

भारतीय चलन एक रुपया (संग्रहित प्रतिमा)

सरकारी बँक म्हणजे कशी एकदम कायद्याने वागणारी यंत्रणा. 'पाणी उपसा करुन संपूर्ण तलाव कोरडा करु पण, तलावात पडलेली सुई आम्ही शोधणारच', असा बाणा वैगेरे असणारी. असाच प्रकार घडला आहे, गाझीयाबाद येथील आयडीबीआय या बँकेसोबत. होय, या बँकेने एक रुपया वसूल करण्यासाठी चक्क ८५ रुपये खर्च करुन ग्राहकाला नोटीस पाठवली आहे.

गाझीयाबाद येथील आयडीबीआय बँकेच्या एका शाखेने १ रुपयाच्या वसुलीसाठी एका ग्राहकाला नोटीस पाठवली. या ग्राहकाने बँकेकडून कर्ज घेतले होते. त्यामुळे या कर्जदारास बँकेने थकीत रक्कम भरण्याबाबत ५ ऑक्टोबरला एक नोटीस पाठवली. या नोटीशीत म्हटले होते की, आपण कर्जाची परतफेड केली. मात्र, कर्जाच्या एकूण रकमेतील एक रुपया अद्यापही बाकी आहे. कर्जरुपात आपल्याकडे असलेला हा पैसा आपण बँकेला परत करावा. कुरीअरच्या माध्यमातून बँकेने ग्राहकाला पाठवलेल्या नोटीशीमध्ये हे पसै आरटीजीएस, एनईएफटी किंवा चेकच्या माध्यमातून जमा करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, प्रत्येक महिन्याला बँक खात्यातून हप्त्यांच्या रुपात पैसे कापले गेल्यानंतरही एक रुपया कसा शिल्लख राहिला. तसेच, बँकेने हे पैसै खात्यातून कापून न घेता नोटीस कशी पाठवली, असा प्रश्न ग्राहकाला पडला आहे. नोटीस मिळालेल्या ग्राहकाच्या समोर हे पसै बँकेला कसे पोहोचवायचे याबबत संभ्रम आहे. या ग्राहकाने प्रसारमाध्यमांना सांगितले की, जर या पैसे चेक स्वरुपात कुरीअर केले तर त्यासाठी ८५ रुपये खर्च येईल. साध्या पोस्टाने पाठवले तरीसुद्धा ५ रुपये खर्च येईल. स्पीडपोस्ट केले तर, १५ रुपये खर्च येईल. हे पैसे मी आरटीजीएस, एनईएफटीच्या माध्यमातून जरी भरायचे म्हटले तरीसुद्धा २.५ रुपये खर्च येईल. त्यामुळे हे पैसे मी कसे भरू याबाबत ग्राहक गोंधळून गेला आहे. (हेही वाचा, वृद्ध डॉक्टरला चोरांनी लावला 20 लाखाचा चुना)

विशेष असे की, विजय मल्ला बँकांना सुमार ९००० कोटी रुपयांचा चुना लाऊन पसार झाला आहे. ही रक्कम विजय मल्ल्याने १७ बँकांकडून घेतलो होती. त्यापैकी देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने माल्याला १६०० कोटी रुपयांचे लोन दिले. पीएनबीने ८०० कोटी तर, आयडीबीआय बँकेने ९०० कोटी, बँक ऑफ इंडियाने ६५० कोटी रुपये, बँक ऑफ बडोदाने ५५० कोटी आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ४१० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते.