Hyderabad Rape And Murder Case: एन्काऊंटर झालेल्या आरोपींचे मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईकांचा स्पष्ट नकार
आरोपींचे मृतदेह 9 डिसेंबरपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश तेलंगणा उच्च न्यायालायाने दिले आहेत. एन्काऊंटरमध्ये ठार झालेल्या आरोपींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचे मृतदेह 9 डिसेंबरनंतर नातेवाईकांना सोपण्यात येणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
हैदराबाद येथे सामूहिक बलात्कार आणि हत्या (Hyderabad Rape and Murder Case) केल्याप्रकरणी चारही आरोपींना पोलिसांनी ठार केले. आरोपींचे मृतदेह 9 डिसेंबरपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश तेलंगणा उच्च न्यायालायाने दिले आहेत. एन्काऊंटरमध्ये ठार झालेल्या आरोपींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचे मृतदेह 9 डिसेंबरनंतर नातेवाईकांना सोपण्यात येणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, त्यापैकी एका आरोपीच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याचे मृतदेह स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे आता तेंलगणा पोलिसच आरोपीवर अंत्यसंस्कार करणार असल्याचे समजत आहे.
हैदराबाद येथे घडलेल्या लज्जास्पद कृत्यावर आरोपींच्या नातेवाईकांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. जर माझ्या मुलाने चूक केली असेल तर, ज्याप्रमाणे त्याने संबधित तरुणीला जाळून मारले. तसेच त्यांनाही मारले पाहिजे. पीडित तरुणीही एका मुलीची आई होती ना? असे मत हैदराबाद येथे पशुवैद्धकीय महिलेवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील एका आरोपीच्या आईने घटना घडल्यानंतर केले होते. हैदराबाद पोलिसांनी गुरुवारी रात्री या घटनेतील सर्व आरोपींचे एन्काऊंटर केले असताना एका आरोपीच्या नातेवाईकांनी त्याचे मृतदेह स्वीकारण्यात स्पष्ट नकार दिला आहे. संबधित आरोपीच्या आईच्या मताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे देखील वाचा-हैदराबाद: एन्काउंटर मध्ये ठार झालेल्या आरोपीची पत्नी म्हणते,'मलाही गोळ्या मारून संपवून टाका'
हैदरबाद येथे 28 नोव्हेंबर रोजी एका महिला डॉक्टरचा बलात्कार आणि हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामुळे संपूर्ण देशात संतापजनक वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाती आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी अनेकांकडून करण्यात आली होती. हैदराबाद पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर पुढील चौकशीसाठी त्यांना घटनास्थळी घेऊन गेले. त्यावेळी आरोपींनी पोलिसांच्या जाळ्यातून पळण्याचे प्रयत्न केले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना थांबण्याचे अवाहन केले. परंतु, आरोपी थांबले नसल्याने पोलिसांना त्यांच्यावर गोळीबार करावा लागला. यात चारही आरोपी ठार झाले.