Hydrabad News: गृहपाठ न केल्याने शिक्षकाने केलेल्या मारहाणीत 5 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू , रामनथपूर येथील घटना

बालवाडीतील विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केल्याने मुलाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

School | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Hydrabad News: हैद्राबादमध्ये (Hydrabad) एका खासगी शाळेतील शिक्षकाने मारहाण केल्याने 5 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू (Death) झाला आहे. बालवाडीतील विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केल्याने मुलाचा मृत्यू झाल्याची  घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला आहे. शनिवारी शाळेत ही घटना घडली. शाळेत शिक्षकाने मारहाण केल्या नंतर तो जमीनीवर कोसळला त्याला तातडीने शाळेतील कर्मचाऱ्याने रुग्णालयात उपचारासाठी नेलं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मीडिया रिपोर्टनुसार, रमांथपूर परिसरातील विवेक नगर येथील शाळेतील यूकेजीच्या एका विद्यार्थ्याने गृहपाठ न केल्यामुळे त्याच्या डोक्यावर शिक्षिकेने पाटीने वार केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या घटनेमुळे शाळेतील वातावरण गंभीर झाले होते. मृत मुलाच्या पालकांनी आणि इतर पालकांनी या घटनेनंतर शाळेसमोर मृतदेहासह आंदोलन केले आहे. शिक्षकावर कडक कारवाईची मागणी केली.

पोलिस या घटनेअंतर्गत तपास करत आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. काही दिवसांपुर्वी उत्तर  प्रदेशात केजीच्या विद्यार्थ्याला मारहाण केल्या प्रकरणी शिक्षकावर तक्रार नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ झाला होता.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif