Madhya Pradesh Accident: ग्वाल्हेर येथे भरधाव बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, १२ प्रवाशी जखमी, ८ गंभीर

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे रात्री उशिरा एक मोठा रस्ता अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Madhya Pradesh Accident: ग्वाल्हेर येथे भरधाव बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, १२ प्रवाशी जखमी, ८ गंभीर
Accident (PC - File Photo)

Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे रात्री उशिरा एक मोठा रस्ता अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भरधाव वेगाच असलेली बस रस्त्यावरील ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकली. या धडकेत 12 प्रवाशी जखमी झाले असून 8 जणांची प्रकृती गंभीर चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. या अपघातात धडक इतकी भीषण होती की बस ट्रॅक्टरसह पलटी झाली.( हेही वाचा-  पोलिसांपासून वाचण्यासाठी I20 ड्रायव्हरने रिव्हर्स गियरमध्ये चालवली गाडी,)

मिळालेल्या माहितीनुसार, हाजीरा पोलिस स्टेशन हद्दीतील मालगाधा चौकात ही अपघात घडला. या अपघातात १२ हून अधिक प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. जखमी प्रवाशांनी सांगितले की,  बस चालकाने गाडी बेधकडपणे चालवत होता आणि रस्त्यावरून समोर येणाऱ्या ट्रॅक्टरला धडक दिली. ही धडक इवढी भीषण होती, बस रस्त्यावर पलटली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले. पोलिसांना या अपघाताची माहिती देण्यात आली.

 

बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. स्थानिकांनी अपघाता जखमी झालेल्या प्रवाशांची मदत केली. या अपघाता ट्रॅक्टरही पलटी झाला. जखमींना  तात्काळ उपचारासाठी हजीरा आणि जेएएच रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघातात बसचे संपुर्ण नुकसान झाले आहे. रात्री उशिरा परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

(The above story first appeared on LatestLY on Feb 22, 2024 01:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).