शाकाहाराला प्रोत्साहन देण्यासाठी हॉलिवूड अभिनेत्री पामेला एंडरसनने लिहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

यात तिने सरकारी कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीयांना शाकाहारी अन्नाचे सेवन करण्यास प्रोत्साहित करण्याची विनंती केली आहे. पामेलाने ‘पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स’ या संस्थेच्यावतीने हे पत्र लिहिले आहे.

Pamela Anderson And PM Modi (PC-Getty and PTI)

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री पामेला एंडरसनने (Hollywood Actress Pamela Anderson)  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)  यांना पत्र लिहिले आहे. यात तिने सरकारी कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीयांना शाकाहारी अन्नाचे सेवन करण्यास प्रोत्साहित करण्याची विनंती केली आहे. पामेलाने ‘पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स’ (People for the Ethical Treatment of Animals) या संस्थेच्यावतीने हे पत्र लिहिले आहे. या पत्रात पामेलाने भारतातील वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. पामेला नेहमी आपल्या वादग्रस्त विधानावरून चर्चेत असते. यावेळी पामेलाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आवाहन केले आहे. त्यामुळे ती प्रचंड चर्चेत आली आहे. (हेही वाचा - Jnanpith Award 2019: मल्याळम कवी अक्किथम यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर)

या पत्रात पामेलाने म्हटले आहे की, भारत हा कृषीप्रधान देश आहे. परंतु, भारतातील लोक शाकाहाराच्या तुलनेत मांसाहार अधिक करतात. देशातील प्रदूषण कमी करायचे असेल तर, शाकाहाराला प्रोत्साहन द्यायला हवे. मांसाहारी कचऱ्यामुळे वायू प्रदुषण होण्याचा धोका वाढतो. तसेच घरे, कारखाने, वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुराचे उत्सर्जन कमीत-कमी असले पाहिजे.

प्लॉस्टिक कचऱ्याचे प्रदूषण थांबवण्यासाठी कागदाच्या पिशव्यांचा वापर वाढवण्यावर भर द्यायला हवा. तसेच रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खत, पॉलिएस्टर ऐवजी सुती कपड्यांचा वापर करणे आवश्यक आहे. प्रदूषण करणाऱ्यांविरोधात ठोस कारवाई करावी. तसेच प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर योग्य कारवाई करण्यात आली पाहिजे, असंही पामेलाने पत्रामध्ये म्हटलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif