House Collapses During Heavy Rain In Madurai: तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस; घराचे छत कोसळून एका 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घराला फरशीचे छत होते आणि ते अंदाजे 50 वर्षे जुने होते. जेव्हा पावसाचा जोर वाढला तेव्हा त्यांच्या घराचे छत कोसळले आणि बालसुब्रमण्यम खाली अडकले.

Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

House Collapses During Heavy Rain In Madurai: मदुराई (Madurai) मधील मथिचियम येथे घराचे छत कोसळून एका 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. बालसुब्रमण्यम, असे या मृताचे नाव आहे. मुसळधार पावसात (Heavy Rain) छत कोसळले तेव्हा बालसुब्रमण्यम झोपला होता. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घराला फरशीचे छत होते आणि ते अंदाजे 50 वर्षे जुने होते. जेव्हा पावसाचा जोर वाढला तेव्हा त्यांच्या घराचे छत कोसळले आणि बालसुब्रमण्यम खाली अडकले.

कोसळल्याच्या आवाजाने शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी अग्निशमन आणि बचाव सेवा विभागाला सूचना दिली. अग्निशमन आणि बचाव सेवा कर्मचाऱ्यांनी बालसुब्रमण्यम यांचा मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढला आणि पोस्टमॉर्टमसाठी सरकारी राजाजी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी, मठीचियम पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (हेही वाचा -Heatwave Alert: पुढील 5 दिवस दिल्ली-एमपी-यूपीसह या राज्यांमध्ये तीव्र उष्मा, IMD ने जारी केला उष्णतेच्या लाटेचा इशारा- VIDEO)

भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील चार दिवसांत दक्षिण तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. विरुधुनगर, तेनकासी, तिरुनेलवेली, तुतीकोरीन आणि कन्याकुमारी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (हेही वाचा - Cyclone Forecast Alert: या महिन्यात बंगालच्या उपसागरात तीव्र चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता; मुंबईसह महाराष्ट्र, ओडिशा आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज)

मंगळवार आणि बुधवार दरम्यानच्या 24 तासांत सकाळी 8:30 पर्यंत, कोविलंकुलम (विरुधुनगर), अरुप्पुकोट्टई KVK AWS (विरुधुनगर) येथे 8 सेमी पावसाची नोंद झाली. राजापालयम (विरुधुनगर), आणि देवकोट्टई (शिवगंगा) येथे 5 सेमी पाऊस झाला तर शंकरनकोइल (टेनकासी), श्रीवैकुंटम (थुथुकुडी) आणि श्रीविल्लीपुथूर (विरुधुनगर) येथे 4 सेमी पाऊस झाला. या कालावधीत रामनाथपुरम, कन्याकुमारी आणि थेनी जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पाऊस झाला.