Madhya Pradesh Shocker: वडिल मुख्याध्यापक असलेल्या शाळेत मुलाचा बेकायदेशीर सहभाग; दोघांविरोधात गुन्हा दाखल
मुलाकडे तसे कोणतेही अधिकार नसताना शाळा प्रशासनात त्याचा बेकायदेशीर सहभाग असल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशमधील अनुपपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिल मुख्याध्यापक असलेल्या शाळेत मुलाचा बेकायदेशीर सहभाग (Headmaster son found managing school)असल्याची घटना समोर आली आहे. मुख्याध्यापक यांचा मुलगा शाळेत मुलांना शिकवत असताना दिसला, त्याशिवाय, महत्त्वाच्या कागदपत्रांवर त्याच्या सह्यादेखील आढळल्या. शनिवारी अनुपपूर जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तन्मय वशिष्ठ शर्मा यांनी शाळेत इन्पेक्शन केले तेव्हा ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी दोघांविरोधात फसवणूकीचा(Fraud)गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा: Palghar News: पालघरमध्ये इमारतीचं रंग काम करताना दुर्घटना, शॉक लागून एकाचा मृत्यू)
चोलना येथील सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा जिल्हा मुख्यालयापासून 25 किमी अंतरावर आहे. अनुपपूर जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तन्मय वशिष्ठ शर्मा यांनी शनिवारी शाळेला भेट दिली. तेव्हा ही घटना उघडकीस आली. तन्मय वशिष्ठ शर्मा म्हणाले की, मुख्याध्यापक चमनलाल कंवर आणि इतर दोन गेस्ट शिक्षक तपासणीदरम्यान शाळेत उपस्थित नव्हते. त्याऐवजी कंवर यांचा मुलगा राकेश प्रताप सिंग हे संस्थेचे शिक्षण आणि व्यवस्थापन करत असल्याचे त्यांना आढळले. (हेही वाचा: Akola Shocker: कुलरचा शॉक लागून 3 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू ,अकोला येथील घटना)
शाळेतील एका महिला शिक्षिकेने सांगितले की, कंवर यांची गेल्या महिनाभरापासून तब्येत ठीक नव्हती त्यामुळे त्यांचा मुलगा त्यांच्या जागी काम पाहत होता. त्यानंतर शर्मा यांनी राकेश प्रताप सिंगविरोधात बेकायदेशीर कामात सहभागी असल्याबद्दल एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले. मुख्याध्यापक चमनलाल कंवर आणि त्यांचा मुलगा राकेश प्रताप सिंग यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित तरतुदींनुसार फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.