Haryana Accident: दिल्ली-जयपूर महामार्गावर भीषण अपघात, कारमधील तिघांचा जळून मृत्यू

या अपघातात तीन जणांचा जिंवत जळून मृत्यू झाला.

haryana accident

Haryana Accident: गुरुग्राममध्ये एका कारचा अपघात झाल्याची माहिती मिळाली. या अपघातात तीन जणांचा जिंवत जळून मृत्यू झाला. दिल्ली- जयपूर महामार्गावर हा अपघात झाला. येथे एका टॅंकरने पिकअप व्हॅन आणि कारच्या धडकेत भीषण अपघात झाला. त्यामुळे कारने पेट घेतला आणि प्रवास करणारी तीन जण जिंवत जळली. या अपघातात पिकअप व्हॅनच्या चालकाचा ही मृत्यू झाला आहे. पोलिस सध्या अपघातात ठार झालेल्यांची ओळख पटवण्यात व्यस्त आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली जयपूर महामार्गावरील सिध्दवराली गावाजवळ रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जयपूरकडून भरधाव ऑईल टॅंकर येत होता. टॅंकरने आधी डिव्हायडरला धडक दिली. आणि नंतर दिल्लीहून जयपूरला जाणाऱ्या लेनमध्ये घुसला. समोरून येणाऱ्या एका कारला धडक दिली. या कारमध्ये सीएनजी असल्यामुळे कारचा स्फोट झाला आणि कारला आग लागली. प्रवाशी कारचे दरवाजे उघडू शकले नाही त्यामुळे तीन जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

पिकअप व्हॅनच्या धडकेत पिकअप चालका मृत्यू झाला. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. कार संपुर्ण जळली असल्यामुळे नंबर प्लेट तपासण्यात अडथळा आला. कारची नंबर प्लेट तपासल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, ही कार पानिपतमधील एका व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत आहे. मात्र, पोलीस चार मृतांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.पिकअप व्हॅनच्या धडकेत पिकअप चालकाचाही मृत्यू झाला. तेथून जाणाऱ्या लोकांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आणि काही लोकांनी जळत्या गाडीचे फोटो आणि व्हिडिओही बनवले.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif