Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे भाव
यासोबतच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून आज एक किलो चांदीचा भाव 0.84 टक्क्यांनी घसरून 56,175 रुपये झाला आहे.
Gold Price Today: तुम्ही दिवाळीनिमित्त सोने-चांदी (Gold-Silver) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली ठरू शकते. सोन्याचा भाव शुक्रवारी घसरला असून तो 50,000 च्या खाली गेला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात घट झाल्याने खरेदीदारांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. एमसीएक्सनुसार, शुक्रवारी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 0.48 टक्क्यांनी घसरून 49,903 वर आली आहे. यासोबतच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून आज एक किलो चांदीचा भाव 0.84 टक्क्यांनी घसरून 56,175 रुपये झाला आहे.
येत्या काळात सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. डॉलरचे मूल्य वाढल्याने सोन्याचे भाव आणखी खाली येऊ शकतात, असे मानले जात आहे. सध्या, डॉलरची ताकद दर्शविणारा डॉलर निर्देशांक सुमारे 22 वर्षांत 113 च्या उच्च पातळीच्या आसपास आहे. (हेही वाचा - GSTR-3B रिटर्न भरण्यासाठी 21 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ)
दिल्ली, मुंबई, लखनऊसह इतर शहरातील सोन्याचा आजचा भाव -
- दिल्लीत 24 कॅरेट शुद्ध 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50,600 रुपये आहे.
- कोलकातामध्ये 24 कॅरेट शुद्ध 10 ग्रॅम सोने 50,450 रुपयांना विकले जात आहे.
- मुंबईत 24 कॅरेट शुद्ध 10 ग्रॅम सोने 50,450 रुपयांना उपलब्ध आहे.
- लखनौमध्ये 24 कॅरेट शुद्ध 10 ग्रॅम सोने 50,600 रुपयांना विकले जात आहे.
- हैदराबादमध्ये 24 कॅरेट शुद्ध 10 ग्रॅम सोने 50,450 रुपयांना उपलब्ध आहे.
- पाटण्यात 24 कॅरेट शुद्ध 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50,480 रुपये आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) प्रसिद्ध केलेल्या दरांनुसार, गुरुवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 50,230 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. यावर्षी 10 ग्रॅम सोन्याचा भाव सर्वोच्च पातळीपासून सुमारे 4,000 रुपयांनी खाली आला आहे.