Gautam Adani पुन्हा बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; Mukesh Ambani यांनाही टाकले मागे, जाणून घ्या किती आहे संपत्ती

अदानी आता जगातील दहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अंबानी 99 अब्ज डॉलर्स संपत्तीसह जागतिक स्तरावर 11 व्या स्थानावर पोहोचले आहेत.

Gautam Adani, Mukesh Ambani (PC - PTI)

Gautam Adani Becomes Asia's Richest Man: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) 100 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. जागतिक निर्देशांकात अदानी 10 व्या स्थानावर आहे, तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) 11 व्या स्थानावर आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांना मागे टाकत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. अदानी आता जगातील दहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अंबानी 99 अब्ज डॉलर्स संपत्तीसह जागतिक स्तरावर 11 व्या स्थानावर पोहोचले आहेत.

अदानी समूहाचे 59 वर्षीय संस्थापक बंदरे आणि विमानतळांपासून ते थर्मल पॉवर आणि कोळशापर्यंतच्या कंपन्यांचे मालक आहेत. आता त्यांची एकूण संपत्ती 100 अब्ज डॉलर्स आहे. गेल्या काही महिन्यांपासून अब्जाधीशांच्या यादीत अदानी आणि अंबानी यांच्यात अव्वल स्थानासाठी चुरस आहे. (हेही वाचा - 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यासाठी अर्थ मंत्रालयाने जारी केली अधिसूचना, मार्चचा पगार दिल्यानंतर मिळणार थकबाकी)

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, अदानी यांनी गेल्या वर्षी त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये $23.5 बिलियनची भर घातली, जी यादीतील सर्वोच्च आहे. दरम्यान, याच काळात अंबानींनी त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये $9.03 अब्जची भर घातली होती. अदानी समूहाच्या खाद्य तेल कंपनीतील अदानी विल-मारचा हिस्सा गेल्या एका आठवड्यात 30 टक्क्यांनी वाढला आहे. 230 रुपये प्रति शेअर या इश्यू किमतीवरून 136 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अदानी विल्मरने प्रारंभिक सार्वजनिक ऑफरद्वारे 3,600 कोटी रुपये उभे केले.

दरम्यान, टेस्लाचे एलोन मस्क हे 273 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यानंतर Amazon चे जेफ बेझोस हे 188 अब्ज डॉलर्स संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. फेब्रुवारीमध्ये, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या दोघांनीही फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीत मार्क झुकरबर्गला मागे टाकले. ते Facebook च्या Meta Platforms चे मालक होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now