1 एप्रिल पासून घरगुती गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, आजच बुक करा
येत्या 1 एप्रिल पासून घरगुती गॅसच्या किंमती वाढणार असल्याची शक्यता आहे.
येत्या 1 एप्रिल पासून घरगुती गॅसच्या किंमती वाढणार असल्याची शक्यता आहे. तर सीएनजी (CNG)आणि पीएनजीचे (PNG) दर जवळजवळ 18 टक्क्यांनी वाढणार आहेत. त्यामुळे याचा फटका सामान्य नागरिकांना बसणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्याने नैसर्गिक वायूंच्या दरात वाढ करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळेच घरगुती गॅसच्या किंमती 18 टक्क्यांनी वाढणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सध्या सुरु असलेल्या गॅस धोरणामुळे केंद्र सरकारकडून प्रत्येकी सहा महिन्यांनी नैसर्गिक वायूचा आढावा घेतला जातो. तर गेल्या वर्षभरात याच्या किंमती अनुक्रमे 5.9 आणि 9.8 टक्क्यांनी वाढल्या होत्या. मात्र आता एप्रिल महिन्यापासून गॅसच्या किंमतीत आणखीनच दर वाढ होणार आहे.
याबद्दल पेट्रोलियम मंत्रालयाने माहिती देत असे सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारानुसार नैसर्गिक वायूच्या किंमती ठरवल्या जातात. या प्रक्रियेत सरकार कोणताही हस्तक्षेप करु शकत नाही. तर 2019 च्या सुरुवातीला कच्च्या तेलाच्या किंमतीत 7 टक्क्यांनी वाढ झाली होती.