Rewa Widow Women Gangrape: हाथरसनंतर मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार; 4 जण ताब्यात
अशातचं आता मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) बलात्काराच्या घटना (Rape Cases) थांबायचं नाव घेत नाहीत. मध्य प्रदेशमधील रीवा जिल्ह्यात (Rewa District) नराधमांनी एका विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची बाब उघडकीस आली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना रीवा जिल्ह्यातील शाहपूर भागातील आहे.
Rewa Widow Women Gangrape: उत्तर प्रदेशमधील हाथरस (Hathras) येथे घडलेल्या सामूहिक बलात्कारच्या (Gangrape) घटनेनंतर संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. अशातचं आता मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) बलात्काराच्या घटना (Rape Cases) थांबायचं नाव घेत नाहीत. मध्य प्रदेशमधील रीवा जिल्ह्यात (Rewa District) नराधमांनी एका विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची बाब उघडकीस आली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना रीवा जिल्ह्यातील शाहपूर भागातील आहे.
प्राप्त माहितीनुसार, विधवा महिला काही कामानिमित्त बाहेर गेली होती. जिथे आरोपीने तिला पकडले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी केलेल्या सामूहिक बलात्कारानंतर पीडित महिला बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. (हेही वाचा - Uttar Pradesh Bhadohi Rape Case: उत्तर प्रदेशच्या भदोही जिल्ह्यात 44 वर्षीय दलित महिलेवर चार जणांकडून सामूहिक बलात्कार, दोन आरोपींना अटक)
दरम्यान बऱ्याच वेळानंतरही पीडिता घरी परत न आल्याने तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला. त्यानंतर ती गावाजवळच्या शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळली. यावेळी पीडितेच्या अंगावर जखमा होत्या. त्यामुळे तिला तातडीने रीवा येथील संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तेथे पीडितेवर उपचार सुरू आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. (वाचा - Mumbai Rape Case: मुंबईमध्ये 5 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वडिलांच्या मित्राकडून बलात्कार; 30 वर्षीय आरोपीला अटक, गुन्हा दाखल)
अद्याप पीडिता शुद्धीवर आलेली नाही. त्यामुळे तिचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. मात्र, या घटनेत 6 जणांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलं असून दोघांचा शोध सुरू आहे. रीवा एएसपी शिवकुमार वर्मा यांनी सांगितले की, 4 ऑक्टोबर रोजी या प्रकरणासंदर्भात 2 व्यक्तीच्या फिर्यादीनुसार पीडित महिलेवर 6 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतले आहे.