MP Rape Case: कॉलेज प्रवेशमध्ये घेण्यासाठी आलेल्या 21 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार, फरार आरोपींचा शोध सुरू
मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) दतिया जिल्ह्यात (Datia district) शुक्रवारी एका महाविद्यालयीन (College) मुलीवर तीन जणांनी निर्दयीपणे सामूहिक बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलगी प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे.
मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) दतिया जिल्ह्यात (Datia district) शुक्रवारी एका महाविद्यालयीन (College) मुलीवर तीन जणांनी निर्दयीपणे सामूहिक बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलगी प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. बलात्कार पीडितेने या प्रकरणी मंगळवारी, म्हणजे 5 ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी महाविद्यालयीन मुलगी घरी परतत असताना आरोपींनी तिचे कॉलेजच्या गेटमधून अपहरण (Kidnapping) केले. त्यानंतर तिला एका निर्जन ठिकाणी नेण्यात आले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual harassment) करण्यात आले. आरोपी मुलीला कॉलेजपासून 30 किमी अंतरावर असलेल्या डाबरा (Dabra) येथे घेऊन गेले. मुलगी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आली होती. 21 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्यानंतर आरोपीने मुलीला शनिवारी इंद्रगढमधील (Indragarh) कोडर सरकार मंदिरात सोडले.