1 मार्चपासून दुधाची किंमत प्रति लिटर 100 रुपये होणार? ट्विटरवर का ट्रेंड होतोय 'हा' हँशटॅग, जाणून घ्या सविस्तर
शेतकरी नेते मलकीत सिंह यांनी 1 मार्चपासून शेतकरी दुधाचे दर वाढवतील, असं म्हटलं आहे.
कृषी कायद्याला विरोध करणारे शेतकरी आता दुधाच्या दराबाबत काही योजना आखत आहेत. शनिवारी मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवरील हॅशटॅग ट्रेंडिंगनुसार, आज पहिल्या क्रमांकावर, 1 मार्चपासून दुधाची किंमत प्रति लिटर 100 रुपये असेल हा ट्रेंड होत आहे. वापरकर्ते ट्विटरवर #1मार्च_से_दूध_100_लीटर हा हॅशटॅग वापरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतींत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे दुधाचे दरही शंभरी पार करणार असल्याचे वृत्त सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विटरवर #1मार्च_से_दूध_100_लीटर हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्याअंतर्गत असा दावा केला जात आहे की, 1 मार्चपासून दुधाची किंमत प्रति लिटर 100 रुपये असेल. ही बातमी सिंहू बॉर्डरवर आंदोलन करणारे शेतकरी नेते मलकीत सिंह यांनी उद्धृत केली आहे. मात्र, या वृत्ताला लेटेस्टली मराठी दुजोरा देत नाही.
ट्विटर वापरकर्त्यांनी हा हँशटॅग देशात ट्रेंडिंगवर आणला आहे. आतापर्यंत हा हँशटॅग वापरून हजारो ट्विट करण्यात आले आहेत. या वृत्तासंदर्भातील वर्तमानपत्राचे कटिंग व्हायरल होत आहे. ज्यामध्ये किंमती वाढल्याचा दावा केला जात आहे. (वाचा - नाशिक पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकात 11 वर्षांच्या सेवेनंतर निरोपाच्या क्षणी Sniffer Dog भावूक; पहा Video)
ट्विटर वापरकर्त्यांचे ट्विट -
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातम्यांमध्ये असं लिहिलं गेलं आहे की, सिंहू सीमेवर आंदोलन करणारे युनायटेड किसान मोर्चाच्या अधिकाऱ्यांनी दुधाची किंमत वाढविण्याविषयी वक्तव्य केलं आहे. शेतकरी नेते मलकीत सिंह यांनी 1 मार्चपासून शेतकरी दुधाचे दर वाढवतील, असं म्हटलं आहे. पन्नास रुपये दराने विकले जाणारे दूध दुप्पट किंमतीला म्हणजेचं 100 रुपये प्रति लीटरने विकले जाईल.
दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्यानंतर त्याबरोबर एक यादी देण्यात येत. यात इंधनावर लागलेल्या वेगवेगळ्या कराची माहिती दिली जाते. सध्या सोशल मीडियावर दुधाच्या किंमतीसंदर्भात व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये दुधावरील बेस प्राइस, हिरवा चारा कर, शेण कर, कामगार शुल्क, शेतकरी लाभांश यासारख्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, याबाबत सध्या कोणत्याही शेतकरी संघटनेने अधिकृतरित्या माहिती दिलेली नाही.