Delhi Shocker: धक्कादायक! लैंगिक इच्छेची मागणी केल्याने मित्राची गोळ्या घालून हत्या; आरोपीला अटक

दक्षिण जिल्ह्याच्या अनेक पथकांव्यतिरिक्त, ग्रेटर कैलाश-एसएचओ अजित सिंह यांच्या देखरेखीखाली एसआय पीसी शर्मा, एएसआय कमलेश आणि हवालदार सुनील यांची टीम देखील या प्रकरणाचा तपास करत होती. पीडित कुटुंबाला 17 जुलै रोजी पुन्हा खंडणीचा फोन आला आणि 17 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. खंडणीसाठी वापरलेला क्रमांक बिहारचा होता.

Gun Shot | Pixabay.com

Delhi Shocker: लैंगिक संबंध न ठेवल्याने संतप्त तरुणाने योगेश कुमार (वय, 32) यांची गोळ्या झाडून हत्या (Murder) केली. यानंतर आरोपीने मित्राचा मृतदेह एका सुटकेसमध्ये ठेवून द्वारकेच्या नाल्यात फेकून दिला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी खंडणीची मागणी सुरू केली. पहिल्यांदा 20 लाख आणि दुसऱ्यांदा 17 लाख रुपयांची खंडणी मागितली. या हत्येचे गूढ उकलताना ग्रेटर कैलास पोलिसांनी आरोपी शशांक सिंगला अटक केली आहे. कारच्या पेट्रोल टाकीवरील स्टिकरवरून आरोपीची ओळख पटली.

दक्षिण जिल्ह्याचे पोलिस उपायुक्त चंदन चौधरी यांनी सांगितले की, दक्षिणपुरी येथील रहिवासी योगेश कुमार बेपत्ता झाल्याची तक्रार आंबेडकर नगर पोलिस ठाण्यात 10 जुलै रोजी देण्यात आली होती. योगेशकुमार 9 जुलै रोजी नोकरीसाठी मुलाखत देतो असे सांगून घरातून निघून गेला होता, असे तक्रारीत म्हटले आहे. योगेशच्या वडिलांनी 14 जुलै रोजी पुन्हा पोलिसांना कळवले की, त्यांचा मुलगा योगेशला सोडण्यासाठी अज्ञात क्रमांकावरून 20 लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. दक्षिण जिल्ह्याच्या अनेक पथकांव्यतिरिक्त, ग्रेटर कैलाश-एसएचओ अजित सिंह यांच्या देखरेखीखाली एसआय पीसी शर्मा, एएसआय कमलेश आणि हवालदार सुनील यांची टीम देखील या प्रकरणाचा तपास करत होती. पीडित कुटुंबाला 17 जुलै रोजी पुन्हा खंडणीचा फोन आला आणि 17 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. खंडणीसाठी वापरलेला क्रमांक बिहारचा होता. (हेही वाचा - Lift Collapses in Noida: नोएडाच्या सेक्टर 137 मधील सोसायटीमध्ये लिफ्ट कोसळली; वृद्ध महिलेचा मृत्यू)

तपासादरम्यान पोलिसांना आढळले की, पीडित योगेश याने 9 जुलै रोजी द्वारका येथील सेक्टर 16 येथील प्लाझा मॉलमधून पिझ्झा खरेदी केला होता. त्याचे बिल ऑनलाइन भरले होते. त्याच्या ऑनलाइन व्यवहाराच्या एसएमएसनुसार, निरीक्षक अजित सिंग यांच्या पथकाने मॉलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. योगेश पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून ड्रायव्हरच्या बाजूला काळ्या कपड्याचा युवक घेऊन उतरत असल्याची माहिती मिळाली. कारच्या फ्युएल टँक कॅप/लिडवर विशेष खूण आणि शब्द असल्याचे तपासात समोर आले. यानंतर एसआय पीसी शर्मा यांच्या पथकाने न्यू अशोक नगर येथील शशांक (27) याला अटक केली.

शशांकने एका पार्टीत मृत योगेशला भेटल्याचे उघड केले. यानंतर त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. मृत योगेश हा बेरोजगार होता. शशांकने त्याला 9 जुलै रोजी नोकरीसाठी बायोडेटा घेऊन मूळचंदकडे बोलावले. यानंतर दोघे द्वारका सेक्टर 16 येथे गेले. येथे योगेशने एका मॉलमधून पिझ्झा खरेदी केला. ते बिअर घेऊन द्वारका सेक्टर 14 मधील निर्जन ठिकाणी गेले. अवैध संबंध न ठेवल्याने शशांक सिंगला राग आला आणि या प्रकरणावरून दोघांमध्ये खडाजंगी झाली. संतापलेल्या शशांकने पिस्तूल काढून योगेशवर गोळी झाडली. दोघेही गे पार्ट्यांमध्ये भेटत असत. 12 जुलै रोजी आरोपींनी पिस्तूल यमुना नदीत फेकले होते.

पोलिसांच्या तपासाची दिशाभूल करण्यासाठी शशांकने बनावट सिमकार्ड तयार केले आणि मयत योगेशच्या कुटुंबीयांना खंडणीचे कॉल करण्यास सुरुवात केली. पार्ट्यांमध्ये लोकांना प्रभावित करण्यासाठी त्याने बिहारमधील त्याच्या मित्राकडून पिस्तूल खरेदी केले होते. आरोपींच्या ताब्यातून 14 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now