MP Youths Vandalised Windows Of Cars: मद्यधुंद अवस्थेत बारा वाहनांच्या काचा फोडल्या,चार जणांना अटक
ही घटना मध्य प्रदेशाच्या जबलपूरमध्ये सोमवारी घडली.
MP Youths Vandalised Windows Of Cars: बर्थडे सेलिब्रेशनच्या नावाखाली मद्यधुंद अवस्थेत तरुणांनी बारापेक्षा जास्त कारच्या खिडक्यांच्या काचा फोडल्याचं प्रकरण समोर आले आहे. ही घटना मध्य प्रदेशाच्या जबलपूरमध्ये सोमवारी घडली. कारच्या काचा फोडणे हे तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रांझी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा- एसबीआय एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न फसला; संपूर्ण रोकड जळून खाक (See Pics)
मिळालेल्या माहितीनुसार, मद्यधुंद होऊन रात्रीच्या वेळीस परिसरातील कारच्या खिडक्यांच्या काचा फोडले. हे संपुर्ण पकरण सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद केले आहे. फुटेजमध्ये गुन्हेगारी स्पष्टपणे दित आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत चार जणांना अटक केले आहे. विशेष म्हणजे वाहनांमध्ये भाजपचे नगरसेवक आणि एका सरकारी अधिकाऱ्याची वाहने होती.
रांझी पोलिस स्टेशनअंतर्गत या गुन्ह्याची तपासणी सुरु आहे. वाढदिवसानिमित्त दारू पार्टी झाली आणि त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत तरुण रस्त्यावर फिरत होते. पार्क केलेल्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसार करत होते. कारची तोडफोड करत असताना रात्री झोपलेल्या नागरिकांना त्रास देत असल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या आरोपीं झडती घेतल्यानंतर त्यांकडून अवैद्य दारू आणि शस्त्र आढळून आले होत. या गोष्टी पोलिसांनी जप्त केले