Ashutosh Tandon Passes Away: उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि भाजप आमदार आशुतोष टंडन यांचे निधन, राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला शोक
आशुतोष टंडन हे योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्रीही होते. आशुतोष टंडन यांच्या X या सोशल मीडिया अकाउंटवरही त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे.
Ashutosh Tandon Passes Away: उत्तर प्रदेश सरकारचे माजी मंत्री आणि लखनौ पूर्वचे आमदार आशुतोष टंडन (Ashutosh Tandon) उर्फ गोपाल जी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. आशुतोष टंडन हे योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्रीही होते. आशुतोष टंडन यांच्या X या सोशल मीडिया अकाउंटवरही त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे.
त्यांच्या निधनाबद्दल देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि लखनौ पूर्वचे आमदार आशुतोष टंडन उर्फ 'गोपालजी' यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्यांचे राजकीय जीवन लखनौच्या जनतेच्या सेवेसाठी समर्पित होते. पक्ष मजबूत करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. (हेही वाचा -UP cabinet meet in Ayodhya: उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळाची अयोध्येत बैठक (Watch Video))
गोपाल भइया हम सबको छोड़ कर चले गये
— Ashutosh Tandon (@GopalJi_Tandon) November 9, 2023
उत्तर प्रदेश के पूर्व मंत्री एवं लखनऊ पूर्व के विधायक, श्री आशुतोष टंडन उर्फ़ ‘गोपालजी’ के निधन से मुझे गहरा दुःख हुआ। उनका राजनीतिक जीवन लखनऊ वासियों की सेवा में समर्पित था।पार्टी को मज़बूती देने में भी उनकी महत्वपूर्ण भूमिका रही है।
लखनऊ और प्रदेश के विकास के लिए, उनके द्वारा…
— Rajnath Singh (@rajnathsingh) November 9, 2023
लखनौ आणि राज्याच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. या दु:खाच्या प्रसंगी, मी त्यांच्या शोकाकुल कुटुंबाप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. ओम शांती! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक संध्याकाळी टंडन यांच्या घरी भेट देणार आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Nov 09, 2023 02:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

