IPL Auction 2025 Live

Buta Singh Passes Away: काँग्रेस नेते, माजी केंद्रीय मंत्री बूटा सिंह यांचे निधन; पंतप्रधान नरेंद्र मोदी, नवीन जिंदल, राहुल गांधी यांनी ट्विटवर वाहिली श्रद्धांजली

केंद्रीय गृहमंत्री, कृषिमंत्री, रेल्वेमंत्री, क्रीडामंत्री आणि बिहारच्या राज्यपालांसह अनेक महत्त्वाची पदेही बूटा सिंह यांनी भूषविली आहेत.

बूटा सिंह (Photo Credits-Twitter)

Buta Singh Passes Away: काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. कॉंग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बूटा सिंह (Buta Singh) यांचे निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. बूटा सिंह हे कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. त्यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, नवीन जिंदल, राहुल गांधी आदी नेत्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून बूटा सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बुटा सिंह यांचा जन्म 21 मार्च 1934 रोजी पंजाबच्या जालंधरमध्ये झाला होता. ते आठ वेळा लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यांच्या निधनाबद्दल माहिती देताना नवीन जिंदाल यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, दिग्गज नेते बूटा सिंह यांच्या निधनाबद्दल ऐकून वाईट वाटले. खासदार, केंद्रीय मंत्री आणि बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांची आठवण येईल. (वाचा - COVID-19 Vaccination in India: कोविड 19 लस भारत भर मोफत उपलब्ध असणार; केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत बूटा सिंह यांना श्रद्धांजली वाहिली - 

पंतप्रधान मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहताना लिहिलं आहे की, बूटा सिंह जी एक अनुभवी प्रशासक आणि दलित, गरिबांच्या हितासाठी प्रभावी आवाज होते. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकल्यानंतर मला दु:ख झालं. मी त्यांचे कुटुंब आणि समर्थकांसाठी संवेदना व्यक्त करतो.

नवीव जिंदाल ट्विट- 

याशिवाय कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करून बूटा सिहं यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राहुल यांनी लिहिले की. सरदार बूटासिंह जी यांच्या निधनाने देशाने एक खरा सरकारी सेवक आणि एक निष्ठावान नेता गमावला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या सेवेसाठी आणि लोकांच्या हितासाठी समर्पित केले. त्यांचे हे कार्य नेहमीचं लक्षात ठेवले जाईल. या कठीण काळात मी त्याच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल संवेदना व्यक्त करतो.

दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री बूटा सिंह हे गांधी घराण्याचे अत्यंत जवळचे होते. केंद्रीय गृहमंत्री, कृषिमंत्री, रेल्वेमंत्री, क्रीडामंत्री आणि बिहारच्या राज्यपालांसह अनेक महत्त्वाची पदेही बूटा सिंह यांनी भूषविली आहेत. त्यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.