Ujjain Rape Case: आधी दारू प्यायला लावली, मग रस्त्याच्या मधोमध केला पीडितेवर बलात्कार; मध्य प्रदेशातील उज्जैनमधील घटना, आरोपीला अटक
आरोपीने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून दारू पाजली आणि नंतर तिच्यासोबत गैरवर्तन केले. आरोपीचे नाव लोकेश असल्याचे सांगण्यात येत असून तो घटना घडल्यानंतर तेथून पळून गेला.
Ujjain Rape Case: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) उज्जैन (Ujjain) येथून भरदिवसा क्रूरतेची घटना समोर आली आहे. उज्जैन शहरात रस्त्याच्या कडेला महिलेवर बलात्कार (Rape) केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने आधी महिलेला दारू पाजली, नंतर लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर महिलेला घटनास्थळी सोडून तो पळून गेला. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेते जितू पटवारी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
प्राप्त माहितीनुसार, हे प्रकरण उज्जैनच्या कोयला फाटक चौकातील असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे एका तरुणाने भरदिवसा एका महिलेसोबत घृणास्पद कृत्य केले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा - Madhya Pradesh Video: अभ्यास न केल्यामुळे विद्यार्थींनीची कापली वेणी, आरोपी शिक्षक निंलबित (Watch Video))
आरोपीने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून दारू पाजली आणि नंतर तिच्यासोबत गैरवर्तन केले. आरोपीचे नाव लोकेश असल्याचे सांगण्यात येत असून तो घटना घडल्यानंतर तेथून पळून गेला. शहरातील सर्वात गजबजलेल्या कोयला फाट्याजवळ ही घटना घडली. यावेळी तेथे अनेक लोक उपस्थित होते, मात्र कोणीही महिलेला मदत केली नाही, उलट लोक या घटनेचा व्हिडिओ काढण्यात व्यस्त राहिले.
काँग्रेसचा सरकारवर निशाणा -
घटनेनंतर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. या घटनेवरून उज्जैन मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीने सरकारवर टीका करत महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करताना उज्जैन सेंट्रल कोतवाली पोलिस स्टेशनचे सीएसपी ओम प्रकाश मिश्रा यांनी सांगितले की, पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे तत्काळ कारवाई केली आणि आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
(The above story first appeared on LatestLY on Sep 06, 2024 03:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

