Delhi Firing Video: दिल्लीत प्रसिध्द दुकानावर गोळीबार; गुन्हा दाखल, घटना सीसीटीव्हीत कैद
एका प्रसिध्द मिठाईच्या दुकानात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना जवळच लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Delhi Firing Video: दिल्लीत (Delhi) एक थरराक घटना घडली आहे. एका प्रसिध्द मिठाईच्या दुकानात दिवसाढवळा गोळीबार (Firing) झाल्याची घटना घडली आहे. ही घटना जवळच लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी दुकानाबाहेर गोळीबार केला आणि घटनास्थळावर एक पत्र टाकून फरार झाले. (हेही वाचा- लग्नाचे आमिष दाखवून महिलेला गंडवले, 2.47 लाख घेऊन आरोपी फरार, खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल)
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिल्लीतील नांगलोई या भागात घडली आहे. परिसरातील रोशन कन्फेक्शनरी दुकानात सकाळी ९.३०च्या सुमारास गोळीबार झाला. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, चेहऱ्यावर मार्स्क लावून आलेले दोन हल्लेखोरांनी दुकानावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी दुकानावर तीन राऊंड गोळ्या झाडल्या. पळून जाण्यापूर्वी त्यांनी दुकानात एक धमकी पत्र ठेवले.
घटनेचा व्हिडिओ
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गोळीबाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दुकानावर गोळीबार का केला हे अद्याप समोर आले नाही. त्यांनी घटनेची तपासणी चौकशी सुरु केली. घटनास्थळी कोणीही गंभीर जखमी झालेले नाही याची माहिती पोलिसांनी दिली. खंडणीसाठी गोळीबार केल्याचा पोलिसांना प्राथमिक तपासात माहिती मिळाली आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहे.