Manipur Election 2024: मोईरांग मतदान केंद्रावर गोळीबार, नागरिकांमध्ये घबराट
मणिपूरमध्ये आज लोकसभेचे मतदान सुरु होते त्यावेळीस धक्कादायक घटना घडली आहे.
Manipur Election 2024: आजपासून देशात ठिकठिकाणी लोकसभा निवडणूक २०२४च्या मतदानाला सुरुवात झाली आहे. मणिपूरमध्ये आज लोकसभेचे मतदान सुरु होते त्यावेळीस धक्कादायक घटना घडली आहे. मणिपूरमध्ये मतदानाच्या दोन केंद्रावर आज धक्कादायक घटना घडली आहे. मतदान केंद्रावर गोळीबार घडला आहे. त्यानंतर ईव्हीएमचीही तोडफोड देखील करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. (हेही वाचा- अभिनेते Rajnikanth, RSS Chief Mohan Bhagwat,तामिळनाडू चे मुख्यमंत्री DMK chief MK Stalin यांनी बजावला लोकसभा निवडणूकीत मतदानाचा हक्क)
मिळालेल्या माहितीनुसार, मणिपूरमधील मोइरांग विधानसभा क्षेत्रातील थामनपोकपी येथील मतदान केंद्राजवळ शुक्रवारी सकाळी गोळीबार केला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर मतदानासाठी आलेल्या नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. विचलित करणाऱ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, गोळीबाराच्या आवाजामुळे नागरिक केंद्राच्या बाहेर पळत आहे.
गोळीबारानंतर पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे की, काही ठिकाणी अशांतताच्या घटना घडल्या आहेत. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी आदिवासींना वाचवण्यासाठी आणि प्रादेशिक रक्षण करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान मणिपूरमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत १५,४४ लाखांहून अधिक मतदारांपैकी सुमारे २८. १९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाच्या पहिल्या दोन तासांत, अंतर्गत मणिपूर मतदारसंघात २९. ४० टक्के मतदान झाले, तर बाह्य मणिपूरमध्ये २६.०२ टक्के मतदान झाले.