Delhi Crime: दिल्लीतील सत्य निकेतन परिसरातील कॅफेत गोळीबार, दोन जणांना अटक
या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केले आहे. दोघेही आरोपी उत्तर पश्चिम दिल्लीतील जहांगीरपूरी येथील रहिवासी आहे.
Delhi Crime: दिल्लीत रविवारी सत्य निकेतन परिसरातील एका कॅफेवर गोळबार झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केले आहे. दोघेही आरोपी उत्तर पश्चिम दिल्लीतील जहांगीरपूरी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी गोळीबार केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंदवला आहे. रविवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. (हेही वाचा- कुख्यात गुंड्यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस निरिक्षकांवर कोयत्याने हल्ला, आरोपी फरार)
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी कॅफेत गोळीबार केल्याप्रकरणी दोन जणांना अटक केले आहे. रविवारी २५ ऑगस्ट रोजी सत्य निकेतन परिसरातील कॅफेत गोळीबार झाला. अहमद आणि मंगल यांनी कॅफेत गोळीबार केला. दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. कॅफेच्या कर्मचाऱ्यांशी पोलिसांनी चौकशी केली. चौकशीतून असे समोर आले की, कॅफेत रात्री ८.३०च्या सुमारास काही लोक जेवणासाठी आले होते. त्याैपकी एक काचेच्या टेबलावर बसला होता. कॅफे मालक रोहित यांनी आक्षेप घेतला.
कॅफे परिसरात गोळीबार
टेबलवर बसण्यावरून दोघांमध्ये जोरजोरात वाद सुरु झाला. नंतर काही जण आले आणि भाडंण आणखी वाढलं. त्याचवेळी एकाने कॅफेच्या बाहेर जाऊन गोळीबार केला. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुध्दात गुन्हा दाखल केला. आरोपी येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.