Gujarat Fire in COVID-19 Care Centre: गुजरातच्या कोविड रुग्णालयात भीषण आग; 14 कोरोना रुग्णांसह 2 स्टाफ नर्सचा मृत्यू

यात 14 कोरोना रुग्णांसह 2 नर्सचा मृत्यू झाला. या घटनेत अनेक रुग्ण जखमी झाले आहेत.

Gujarat Fire in COVID-19 Care Centre (PC - ANI)

Gujarat Fire in COVID-19 Care Centre: गुजरातच्या भरुचमधील कोविड रुग्णालयात शुक्रवारी रात्री उशिरा भीषण आग लागल्याची घटना घडली. यात 14 कोरोना रुग्णांसह 2 नर्सचा मृत्यू झाला. या घटनेत अनेक रुग्ण जखमी झाले आहेत. भरूचमधील पटेल वेलफेअर रुग्णालयात रात्री 12.30 ते 01 च्या दरम्यान हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताचं अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या. पटेल वेलफेयर रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील कोरोना रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर बनविण्यात आले होते.

या घटनेची माहिती देताना भरुचचे एसपी राजेंद्रसिंह चुड़ास्मा म्हणाले की, या रुग्णालयाच्या कोविड वॉर्डात कोरोनाचे 12 रुग्ण मरण पावले आहेत. मृतांची संख्येत आणखी वाढ होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सुमारे 50 जणांना दुसर्‍या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (वाचा - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा येत्या 31 मे पर्यंत स्थगित)

दरम्यान, चार मजली रुग्णालय भरूच-जंबूसर महामार्गावर असून ते एका ट्रस्टद्वारे चालविण्यात येत आहे. अग्निशमन अधिकारी शैलेश सांशिया यांनी सांगितले की, या रुग्णालयात कोविड वॉर्ड पहिल्या मजल्यावर बांधण्यात आला होता. एका तासाच्या आत ही आग आटोक्यात आणली गेली आणि अग्निशामक कर्मचारी आणि स्थानिकांच्या मदतीने कमीतकमी 50 जणांना रुग्णालयातून सुखरूप वाचविण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या अधिकाऱ्याने सांगितले की, वाचविण्यात आलेल्या लोकांना दुसर्‍या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. हॉस्पिटलमध्ये लागलेल्या या भीषण आगीत अनेक वैद्यकीय वस्तू जळून खाक झाल्या असून रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif