आजपासून सुरु होणार नवे आर्थिक वर्ष; घर खरेदीसह या गोष्टी होणार स्वस्त, तर या गोष्टी महागणार
1 एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरु होत आहे. पार पडलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदी आणि जीएसटी परिषदेत घेतलेले निर्णय यांची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर काही गोष्टी स्वस्त होणार आहेत तर काही महागणार आहेत
1 एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरु होत आहे. पार पडलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदी आणि जीएसटी परिषदेत घेतलेले निर्णय यांची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर काही गोष्टी स्वस्त होणार आहेत तर काही महागणार आहेत. सर्वसामान्यांसाठी दिलासादायक म्हणजे घरांच्या किंमती आता कमी होणार आहेत. निर्माणाधीन घरांवरील (under-construction flat) जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणला आहे तर सवलतीच्या घरांवरील (Affordable housing ) जीएसटी 5 टक्क्यांवरून 1 टक्क्यावर आणला आहे. चला पाहूया या 1 एप्रिलपासून काय होणार स्वस्त आणि काय होणार महाग
या गोष्टी होणार स्वस्त –
> घर खरेदी – 1 एप्रिलपासून घरांच्या जीएसटीच्या दरांमध्ये बदल होणार आहेत, तसेच सीमेंट वगळता बाकी वस्तुंवरील जीएसटी स्लॅब कमी केला आहे. त्यामुळे घर खरेदी स्वस्त होईल.
> जीवन विमा – 1 एप्रिलपासून जीवन विमा खरेदी करणे स्वस्त होणार आहे. या नव्या बदलाचा फायदा 22 ते 50 वर्ष वयोगटाला होणार आहे.
> कर्ज घेणे - बॅंकांमध्ये एमसीएलआर ऐवजी आरबीआय रेपो रेट आधारावर लोन मिळणार आहेत. यामुळे कर्ज स्वस्त होऊ शकते. तसेच व्याजदरही घटू शकतो.
> बुकिंग रिफंड – तुम्ही रेल्वेचे तिकीट काढले असेल, मात्र काही कारणास्तव तुमची ट्रेन चुकली तर तुम्हाला ते पैसे परत मिळू शकतात. अन्यथा तुम्ही त्याच तिकिटावर दुसऱ्या ट्रेनमधून प्रवास करू शकता.
> ईपीएफओ ट्रान्सफर – नोकरी बदलल्यावर आता तुम्हाला ईपीएफओसाठी अर्ज करावा लागणार नाही. तुमचा ईपीएफओ तुमच्या नवीन कंपनीत डायरेक्ट ट्रान्सफर करता येणार
> केंद्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीनुसार करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आजपासून पाच लाख रुपये होणार आहे.
> नॅशनल पेंशन स्कीममध्ये गुंतवलेले पैसे, त्यावर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी पिरीयड पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या पैशावर कोणताही कर लागणार नाही.
या गोष्टी होणार महाग –
> कार खरेदी – 1 एप्रिलपासून जवळजवळ सर्वच कार निर्माण कंपन्यांचे कार तयार करण्याचे पार्टस महागणार आहेत, त्यामुळे कार खरेदीही महागणार आहे.
> सीएनजी गॅस – 1 एप्रिलपासून सीएनजी गॅसच्या किमतीमध्ये 18 % वाढ होणार आहे. त्यामुळे गाडी चालवणेही महागणार आहे. (हेही वाचा: एप्रिल महिन्यात बदलणार 'या' गोष्टी,कोणत्या आहे ते जाणून घ्या)
> घरगुती गॅस - 1 एप्रिलपासून पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करणाऱ्या सर्व सोसायटी अथवा कॉम्प्लेक्समधील गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)