Wolf Scare in Bahraich: अखेर बहराइच येथील पाचवा लांडग्याला पकडण्यात यश; वनविभागाकडून शोधमोहिम सुरु

आता पर्यंत पाच लांडगे वनविभागाकडून पकडण्यात आले आहे. अद्याप एकाच्या शोधात आहे. डीएफओ अजित प्रताप सिंग यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्ही पाचवा लांडगा पकडला आहे.

Wolf Photo Credit X

Wolf Scare in Bahraich: उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये सकाळी वनविभागाच्या पथकाने एका लांडग्याला जेरबंद केले आहे. आता पर्यंत पाच लांडगे वनविभागाकडून पकडण्यात आले आहे. अद्याप एकाच्या शोधात आहे. डीएफओ अजित प्रताप सिंग यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्ही पाचवा लांडगा पकडला आहे. आणखी एकाला पकडायचे आहे. आम्ही त्याला लवकरच पकडू. उर्वरित लांडग्याला पकडण्यासाठी आम्ही दररोज सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. (हेही वाचा- सांगली मधील आटपाडीतील जनावरांच्या बाजारात तब्बल 1.50 कोटी रुपयांचा मोदी बकरा विक्रीस)

प्राप्त माहितीनुसार, मागील आठवड्यात बराइचमध्ये भटकणाऱ्या लांडग्यांनी सहा जणांना मारून टाकले. तसेत आठ मुलांवर हल्ला केला. या हल्ल्यात मुले मरण पावली. ऐवढेच नाही तर ४० हून अधिक लोकांवर त्यांनी हल्ला केला. वनविभागाने २९ ऑगस्ट रोजी चौथ्या लांडग्याला पकडण्यात आले. लांडग्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहे.

वनविभागाकडून लांडगा जेरबंद 

वृत्तसंथ्या एएनआयने पिंजऱ्यात बंद केलेल्या लांडग्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लांडग्याला पकडण्यासाठी १६५ वन कर्मचारी आणि १८ नेमबाज तैनात केले आहे. ज्यांना थर्मल कॅमेरा - सुसज्ज ड्रोन आणि संपूर्ण जंगलात स्नॅप कॅमेरे बसवले आहेत. लांडगे आणि इतर वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी घरांंमध्ये दरवाजे बसविण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे.