Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशात बापाच्या नात्याला कलंक! अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक
Minor Rape Case

Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका व्यक्तीने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मेरठ  जिल्ह्यातील जानी पोलिस स्टेशन परिसरातील ही घटना आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. 14 वर्षाच्या मुलीवर वडिलांनी बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आले आहे. तीने तक्रारीत असं म्हटलं आहे की, तिचे वडिल 15 जानेवारीपासून तिच्यावर बलात्कार करत आहे.( हेही वाचा- लग्नाचा आमिष दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार, आरोपीवर गुन्हा दाखल, सोलापूरातील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई लखनौला गेली होती, तेव्हा ती घरात एकटी होती. या गोष्टीचा फायदा घेत वडिलाने मुलीवर अत्याचार केला.तिला वेदना असहाय्य झाल्याने या घटनेची माहिती आईला दिली. मुलीला वैद्यकिय तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहे. मुलाचा जबाब नोंदवला जाईल अशी माहिती पोलिसानी दिली. मुलीला वडिलांनी जीवे मारण्याची धमकी देखील दिली त्यामुळे ती घाबरून गेली होती.

पीडित मुलीचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. ज्यात तिने वडीलांनी बलात्कार केल्याचे सांगितले आणि जीवेमारण्याची धमकी दिली होती तेही तीने स्पष्ट सांगितले. या घटनेनंतर पोलिसांत पीडित मुलीच्या आईने तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.