Father and Cousin Assaulted With Sticks: चुकीच्या नंबरवर मेसेज पाठवल्याने राडा, भावासह वडिलांना मारहाण, गुन्हा दाखल
या वादाचे रुपांतर भांडणात झाले. या भांडणातून दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
Father and Cousin Assaulted With Sticks: अहमदबादमध्ये चुकीच्या नंबरवर अल्पवयीन मुलाने मेसेज पाठवल्याने वाद झाला होता. या वादाचे रुपांतर भांडणात झाले. या भांडणातून दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. 11 मे रोजी ही घटना घडली होती. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलाला वर्ग मित्राला मेसेज पाठवण्या ऐवजी त्याने चुकीच्या नंबरवर मेसेज पाठवल्याने ही घटना घडली. हेही वाचा- दिल्लीतील 4 रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाचा चुलत भाऊ धार्मिक सानिया (बडोदरा दसक्रोई गावातील रहिवासी ) याने विवेकांनद पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. धार्मिक सानियाने आपल्या तक्रारीत म्हटले की, चुलत भावाने त्याचा वर्ग मित्राला मेसेज पाठवण्या ऐवजी चुकून दुसऱ्या अज्ञात महिलेला मेसेज पाठवला. तो मेसेज महिलेने तीच्या नवऱ्याला दाखवला. संतापलेल्या नवऱ्याने मुलाला फोन करून रेस्टॉरेंटमध्ये बोलावून घेतेल. याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती.
अल्पवयीन मुलाने घडलेला प्रकार धार्मिकला पाठवला. धार्मिक चुलत भावाला घेऊन रेस्टोंरेटमध्ये गेला. तेथे महिलाचा नवरा ( कनू भारवड ) असं नाव असलेल्या व्यक्तीने धार्मिक आणि त्याच्या चुलत भावाला शिवीगाळ करू लागला. धार्मिकने खुपदा समजवण्याचा प्रयत्न केला तरी त्याने एक ऐकले नाही. कनू भारवड सोबत आणखी तीन चार जण होते त्यांनी धार्मिक आणि त्याच्या भावाला मारहाण करायला सुरुवात केली. भांडण पाहून धार्मिकच्या वडिलांनी मद्यस्ती करण्याचा प्रयत्न केला परंतु मारहाणीत त्यांना दुखापत झाली.
या मारहाणीत तीन जण गंभीर जखमी झाले. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल करुन घेतला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.