Etawah Road Accident: इटावामध्ये आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; डबल डेकर बस आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत 6 जणांचा मृत्यू
धडकेनंतर बसचा पुढील भाग निखळला. तसेच बसमधून प्रवास करणारे प्रवासी जखमी झाले.
Etawah Road Accident: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) इटावा (Etawah) येथे आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वे (Agra Lucknow Expressway) वर भीषण अपघात (Accident) झाला. डबल डेकर बस (Double Decker Bus) आणि कार (Car) यांच्यात भीषण टक्कर झाल्याने 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचबरोबर या अपघातात सुमारे 45 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इटावा एसएसपी संजय कुमार यांनी सांगितले की, शनिवारी रात्री डबल डेकर बस आणि कार यांच्यात जोरदार टक्कर झाली. या धडकेनंतर कार एक्स्प्रेस वेपासून सुमारे 20 फूट खाली पडली. अपघातातील जखमींना वाचवण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांच्या पथकाकडून मदत आणि बचावकार्य राबविण्यात येत आहे. आग्रा एक्स्प्रेस वेवर रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. इटावा एसपीसह सर्व अधिकाऱ्यांनी अपघाताची माहिती घेतली. त्याचवेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातातील मृतांप्रती शोक व्यक्त केला आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या उपचारासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
अपघातात 45 हून अधिक जखमी -
प्राप्त माहितीनुसार, कार आणि डबल डेकर बस यांच्यात जोरदार धडक झाली. अपघातानंतर कार भरधाव वेगात गेली आणि एक्स्प्रेस वेवरून खाली पडली. त्याचबरोबर बसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 45 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सुमारे 15 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. (हेही वाचा -Andra Pradesh Accident: तीन वाहनांची धडक, 3 जण दगावले, आंध्रप्रदेशातील घटना)
डबल डेकर बस आणि कारची धडक एवढी जोरदार होती की, दोन्ही वाहनांचे पुर्णपणे नुकसान झाले. धडकेनंतर बसचा पुढील भाग निखळला. तसेच बसमधून प्रवास करणारे प्रवासी जखमी झाले. आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर झालेल्या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. गाडी एक्स्प्रेस वेवरून खाली पडताच पोलिसांच्या पथकाने बचावकार्याला सुरुवात केली. कारमधील जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. (Jammu and Kashmir Accident: अमरनाथ यात्रेकरूना घेऊन जाणाऱ्या व्हॅनचा अपघात, दोन जण जखमी)
पहा व्हिडिओ -
घटनेची माहिती मिळताच इटावा एसपींनीही त्याचा आढावा घेतला. बस चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. भरधाव वेगात असलेल्या बसने समोरून जाणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. गाडी चुकीच्या दिशेने जात होती. त्यामुळेही हा अपघात झाला. बसमध्ये 70 जण होते. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी उपचारादरम्यान 3 जणांचा मृत्यू झाला. तथापी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (हेही वाचा- कोस्टल रोड भुयारी मार्गात भरधाव BMW चा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार भिंतीवर आदळली (Watch Video)
आग्रा एक्स्प्रेस वेवर झालेल्या अपघातात 70 पैकी 45 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. यातील 15 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. ही संपूर्ण घटना शनिवार-रविवार रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे.