Meerut Building Collapses: मेरठमध्ये भीषण अपघात, बांधकामाधीन कोल्ड स्टोरेजचा लेंटर पडला; 5 मजुरांचा मृत्यू
अचानक झालेल्या अपघातामुळे खळबळ उडाली असून, त्यानंतर आता पोलीस प्रशासन बचावकार्यात गुंतले आहे.
Meerut Building Collapses: उत्तर प्रदेशातील मेरठ (Meerut) मध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील बांधकाम सुरू असलेल्या कोल्ड स्टोरेज (Cold Storage) चा लेंटर खाली पडल्याने झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर एकूण सात जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी दोन जण जिवंत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी हा अपघात झाला, त्या वेळी डझनहून अधिक मजूर तेथे काम करत होते. हे मजून ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. अचानक झालेल्या अपघातामुळे खळबळ उडाली असून, त्यानंतर आता पोलीस प्रशासन बचावकार्यात गुंतले आहे.
जेसीबीने मलबा हटवून कामगारांना बाहेर काढले जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना मेरठच्या दौराला पोलीस स्टेशन परिसरातील जनशक्ती कोल्ड स्टोरेजची आहे. हे शीतगृह बसपाचे माजी आमदार चंद्रवीर यांच्याशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. (हेही वाचा - Cut Off Fingers In Mohali: धक्कादायक! पंजाबमध्ये तलवारीने कापली तरुणाची बोटं; काय आहे नेमकी प्रकरण? जाणून घ्या, Watch Video)
प्राप्त माहितीनुसार, कोल्ड स्टोरेजमध्ये बांधकाम सुरू होते, त्यादरम्यान लेंटर पडला. लेंटरखाली डझनहून अधिक मजूर काम करत होते. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
माहिती मिळताच मेरठचे एसएसपी आणि केंद्रीय राज्यमंत्री संजीव बल्यान घटनास्थळी पोहोचले. संजीव यांनी घटनास्थळी उपस्थित मजुरांशी संवाद साधून घटनेची माहिती घेतली. दौरालाचे सीओ अभिषेक यांनी सांगितले की, 5 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 12 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. बचाव कार्य केले जात आहे. जेसीबी मशीनने डेब्रिज हटवण्याचे काम सुरू आहे.