Deoria Six Murder Case: उत्तर प्रदेशातील देवरिया येथे खळबळजनक घटना, माजी जिल्हा पंचायत सदस्यासह 6 जणांची हत्या

घटनेचा बदला म्हणून आरोपी पक्षाचे सत्यप्रकाश दुबे यांच्या दारात जमा झालेल्या जमावाने सत्यप्रकाश दुबे यांची हत्या केली.

Deoria Six Murder Case (PC - Twitter)

Deoria Six Murder Case: उत्तर प्रदेशातील देवरिया (Deoria) जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. रुद्रपूरजवळील फतेहपूर गावात जुन्या वैमनस्यातून सहा जणांची निर्घृण हत्या (Murder) केल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी आरडाओरडा झाला. सध्या गावात तणावाचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पीएसी घटनास्थळी पोहोचले. सहा जणांच्या हत्येने पोलीस विभागातही खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवरियाच्या रुद्रपूर कोतवाली भागातील फतेहपूरच्या लेहरा टोला येथे सोमवारी सकाळी माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रेम यादव यांची बेदम मारहाण करण्यात आली. घटनेचा बदला म्हणून आरोपी पक्षाचे सत्यप्रकाश दुबे यांच्या दारात जमा झालेल्या जमावाने सत्यप्रकाश दुबे यांची हत्या केली. (हेही वाचा - Manipur Violence: मणिपूर विद्यार्थी हत्येप्रकरणी चौघांना अटक, आरोपी CBI कडे हस्तांतरीत)

यानंतर संतप्त जमावाने एक महिला आणि अन्य दोन निरपराधांची हत्या केली. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif