केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ; ग्राहकांच्या खरेदी दरात नाही होणार बदल

कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. मात्र, अद्यापही कोरोनाबाबत सकारात्मक बदल दिसून आला नाही

पेट्रोल, डिझेल Photo Credits: PTI)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. मात्र, अद्यापही कोरोनाबाबत सकारात्मक बदल दिसून आला नाही. दरम्यान, सरकारला कोटी रुपयांचे खर्च करावे लागत आहे. नुकतेच दिल्ली सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel And Petrol Prices) किंमतीत वाढ केली आहे. यातच केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात 8 रुपयांची वाढ केली आहे. मात्र , ही वाढ ग्राहकांसाठी नसून त्यांना जुन्या दरात पेट्रोल आणि डिझेल मिळणार आहेत.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेल आणखी महाग झाले आहे. दिल्ली सरकारने वाहनांच्या इंधनावरील व्हॅट करामध्ये वाढ केली आहे. दिल्ली शहरात प्रतिलिटर पेट्रोल 1.67 रुपये तर डिझेलच्या किंमतीत प्रतिलिटर 7.10 रुपयांनी वाढ केली आहे. प्रतिलिटर पेट्रोलमध्ये उत्पादन शुल्क कराचे 22.98 रुपये आणि व्हॅटचा वाटा 16.44 रुपये आहे. तेच डिझेलवर उत्पादन शुल्क कर 18.83 रुपये आणि व्हॅट 16.26 रुपये आहे. लॉकडाउनमुळे अर्थचक्र ठप्प असल्याने सर्व राज्यांच्या तिजोरीमध्ये ख़डखडाट आहे. अशा परिस्थितीत सर्वच राज्यांची पेट्रोल-डिझेल विक्रीवर महसूलाची भिस्त आहे. हे देखील वाचा-

एएनआयचे ट्वीट-

केंद्र सरकारने घेतलेला निर्णय 6 मे 2020 पासून आमलात येणार आहे. याआधी पंजाबच्या सरकारनेही ऑटो इंधनाच्या दरावर व्हॅट वाढवला होता. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतात 24 पासून लॉकडाउन घोषीत केला आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत घट झाल्याचे दिसत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif