Madhya Pradesh Shocker: प्रेयसीचे दुसरीकडे लग्न जमल्याने संतापलेल्या प्रियकराने अपहरण करून केला बलात्कार; गुन्हा दाखल

२२ वर्षाच्या तरुणीचे दुसऱ्या पुरुषाशी लग्न झाल्याची माहिती मिळताच, तीच्या प्रियकराने तरुणीला घरातून पळवून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

madhya pradesh pc twitter

Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २२ वर्षाच्या तरुणीचे दुसऱ्या पुरुषाशी लग्न झाल्याची माहिती मिळताच, तीच्या प्रियकराने तरुणीला घरातून पळवून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. ही घटना अशोक नगर जिल्ह्यात घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आले आहे. (हेही वाचा- नाशिकमध्ये 17 वर्षाच्या मुलाची हत्या, काही तासांत पोलिसांकडून तीन आरोपींना अटक)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेयसीचे दुसरीकडे लग्न जमल्याची माहिती मिळताच, प्रियकराने तरुणीचे अपहरण केले आणि त्यानंतर तीच्यावर बलात्कार केला. सलीम खान असं अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याने मित्रांच्या मदतीने घरातून जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न केला.या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना गुरुवारी घटना घडली. तरुणीला जबरस्तीने ओढत घेऊन जात असताना, तिच्या वडिलानी आणि भावाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

तरुणीला घरच्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु रागाच्या भरात सलीमने त्यांच्यावर तलवार आणि काठ्यांनी हल्ला केला. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला. त्यानंतर कुटुंबानी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. पीडितेच्या कुटुंबानी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सलीम आणि त्यांच्या मित्राविरुध्द अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी पथक नेमल्यानंतर सलीम खानला त्वरीत पकडले आणि त्याच्याविरुध्द कायदेशीर कारवाई सुरु केली.