Nashik Crime: नाशिकमध्ये 17 वर्षाच्या मुलाची हत्या, काही तासांत पोलिसांकडून तीन आरोपींना अटक

नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून १७ वर्षाच्या मुलीचा हत्या करण्यात आली आहे.

Nashik Crime: नाशिकमध्ये 17 वर्षाच्या मुलाची हत्या, काही तासांत पोलिसांकडून तीन आरोपींना अटक
Murder | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Nashik Crime: नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून 17 वर्षाच्या मुलीचा हत्या करण्यात आली आहे. ही घटना पेठ रोडवरील कर्णनगर परिसरात घडली आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. पोलिसांनी या प्रकरणी तपास घेत तीन जणांना ताब्यात घेतले आहे. एकीकडे नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसत आहे.  (हेही वाचा- जया शेट्टी खून प्रकरणात गँगस्टर छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा, मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टाचा निकाल)

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष दशरत असं हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. गुरुवारी जेवण झाल्यानंतर तो घराच्या बाहेर उभा होता त्यावेळीस काही अज्ञातांना त्याचावर हल्ला केला. धारदार शस्राने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला. हल्लेखोर घटनास्थळावरून हल्ला करून फरार झाले. आशिषने आरडाओरड केल्याने शेजारचे बाहेर आले. तेवढ्यात पीडित रक्तबंबाळ अवस्थेत दिसला. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आला परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर आशिषच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आणि काही तासांतच संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीतून असे दिसून आले की, आशिषचं संशयित आरोपींसोबत  कबुतर उडवण्याच्या शर्तयीत वाद झाला होता. याच वादाच्या कारणावरून त्याची हत्या करण्यात आली. रात्री उशिरा पर्यंत पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु ठेवला होता. या प्रकरणासाठी पोलिसांनी तात्काळ पथक नेमले होते. या प्रकरणी पंचवटी पोलिस पुढील कारवाई करत आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 31, 2024 07:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).