इंग्रजी लेखक Amitav Ghosh यांना 2018 चा साहित्यातील मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

2018 चा ज्ञानपीठ पुरस्कार सुप्रसिध्द इंग्रजी लेखक अमिताव घोष यांना जाहीर झाला आहे

अमिताव घोष (Photo credit : youtube)

साहित्य क्षेत्रातील मानाच्या अशा ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. 2018 चा ज्ञानपीठ पुरस्कार सुप्रसिध्द इंग्रजी लेखक अमिताव घोष (Amitav Ghosh) यांना जाहीर झाला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीची बैठक आज पार पडली, त्यात ही घोषणा करण्यात आली. यंदाचा 54वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे. अमिताव घोष यांच्या 'द शॅडो लाइन्स' (The Shadow Lines) या 1988 सालच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. फिक्शन आणि नॉन फिक्शन अशा दोन्ही प्रकारांत अमिताव घोष यांनी विपुल लेखन केले आहे.

अमिताव घोष यांचा जन्म कोलकात्यात 11 जुलै 1956 साली एका बंगाली कुटुंबात झाला. त्यांनी सेंट स्टिफन कॉलेज, दिल्ली (St. Stephen's College, Delhi University) आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (Delhi School of Economics) येथून पदवीचे शिक्षण घेतले. घोष यांनी आपल्या कारकिर्दीचे सुरुवात इंडियन एक्स्प्रेस (Indian Express) या वर्तमानपत्रामधून केली. घोष यांचे याआधी अमेरिकेमध्ये वास्त्यव्य होते. ते हार्वर्ड विद्यापीठाचे गेस्ट लेक्चररदेखील होते. भारतात परतून त्यानी इबिस त्रयी (Ibis trilogy) वर काम करण्यास सुरुवात केली, ज्यात सी ऑफ पॉपीज (Sea of Poppies - 2008), रिव्हर ऑफ स्मोक (River of Smoke - 2011) आणि फ्लड ऑफ फायर (Flood of Fire - 2015) यांचा समावेश आहे.

2007 साली त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरवले. इंग्रजी भाषेतील नामवंत लेखकांमध्ये घोष यांची गणना केली जाते. घोष यांच्या द सर्कल ऑफ रीजन (The Circle of Reason), द शेडो लाइन्स, द कलकत्ता क्रोमोजोम (The Calcutta Chromosome), द ग्लास पॅलेस (The Glass Palace), द हंगरी टाइड (The Hungry Tide) या काही प्रसिद्ध कादंबऱ्या होय.

साहित्य अकादमी पुरस्कार हा साहित्यातील मानाचा पुरस्कार मानला जातो. आतापर्यंत हिंदी भाषेत 11, कन्नड भाषेत 8, बंगाली भाषेत 6 तर गुजराती, मराठी, ओडिया आणि उर्दू भाषेत 4 ज्ञानपीठ पुरस्कार दिले गेले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif