What To Do After 10th: 10 वी नंतर काय करावे? कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यावा? जाणून घ्या
What To Do Career After 10th Result 2022: आज दहावीचा निकालानंतर (10th Exam Result) बऱ्याच विद्यार्थाना हा प्रश्न पडतो की दहावी नंतर काय करावे? आणि कोणते शिक्षण घ्यावे. कारण दहावी नंतर योग्य शिक्षण घेणे हा विद्यार्थाच्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीचा पाया असतो.
Career After 10th Result 2022: आज दहावीचा निकालानंतर (10th Exam Result 2022) बऱ्याच विद्यार्थाना हा प्रश्न पडतो की दहावी नंतर काय करावे? आणि कोणते शिक्षण घ्यावे. कारण दहावी नंतर योग्य शिक्षण घेणे हा विद्यार्थाच्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीचा पाया असतो. बऱ्याच विद्यार्थाना सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स याच्या व्यतिरिक्त शिक्षण घेण्याचे बरेच मार्ग पर्याय उपलब्ध आहेत. काही विद्यार्थ्यांना चागल्या प्रकारे शिक्षण उपलब्ध होत नाही, शिक्षकांचे मार्गदशन योग्य प्रकारे मिळत नाहीत. कारण आपल्या पुढील वाटचालीस शिक्षकांचे मार्गदर्शन खूप गरजेचे असते. पंरतु देशात दहावी नंतर करियर करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या मनात शंका असते की दहावीच्या नंतर कोणता विषय घ्यावा कोणत्या करियर ची निवड करावी हेच आपन योग्य प्रकारे जाणून घेणार आहोत.
दहावी नंतर मुख्य तीन शाखा -
कला ( Arts )
विज्ञान ( Science )
वाणिज्य ( Commerce )
कला शाखा ( Arts )
ज्या मुलांना दहावीच्या परीक्षेत कमी गुण आहेत, किंवा ज्यांना जास्त गुण असुन ही कला हा विषय निवडतात. अभ्यास करणे सर्वात सोपे मानले जाते. या सर्व गोष्टींशिवाय, ज्या मुलांना साहित्य विषय आवडतात (जसे की मराठी हिंदी & इंग्रजी इत्यादी भाषा), वकील, मानसशास्त्रज्ञ, इतिहास, राजकारण इत्यादी, हा विषय निवडा आणि त्याचा अभ्यास करा.
विज्ञान शाखा ( Science )
दहावीच्या नंतर विज्ञान हे जास्त आकर्षक विषय आहे. बरेच विद्यार्थी Science विषय मिळवण्यासाठी इच्छुक असतात. कारण की Science विषय घेतल्यावर पुढे एक चांगले करिअर ऑप्शन्स मिळते.उदा, Engineering, Medical, Computer Science, ITआणि बरेच काही.
वाणिज्य शाखा ( Commerce )
वाणिज्य हा विषय आहे ज्याला विद्यार्थ्यांनी दहावी उत्तीर्ण केल्यानंतर प्राधान्य दिले आहे. जी मुलं विज्ञानाला अवघड समजतात, ते कॉमर्स निवडू शकतात याशिवाय ज्यांना बँकिंग, बिझनेस, फायनान्स या क्षेत्रात काम करायचे आहे ते कॉमर्स विषय निवडतात. चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच सीए, कॉमर्स हे त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे स्वप्न असते.
दहावी नंतर ITI Course
ज्याना दहावी नंतर लवकरात लवकर नौकरी पाहिजे असते, ते विध्यार्थी दहावी नंतर ITI करू शकतात. अनेकदा असे दिसून येते की ज्या मध्यमवर्गीय कुटुंबातील लोक आर्थिक स्थिती चांगली नसते किंवा त्यांच्या मुलाने दहावीची परीक्षा उत्तीर्ण करावी आणि असे काही अभ्यास करावेत जेणेकरून त्याला लवकर नोकरी मिळेल आणि लवकरात लवकर पैसे मिळतील अशी त्यांची अपेक्षा असते. अश्या मुलांना ITI हा पर्याय खुप योग्य मानला जोतो. (हे देखील वाचा: Maharashtra Board Class 10 Result 2022: महाराष्ट्रात दहावीचा निकाल 96.94%; 1 वाजता ऑनलाईन निकाल पहा mahresult.nic.in वर)
दहावीनंतर डिप्लोमा (Diploma)
दहावी नंतर विद्यार्थानां Diploma हा एक चांगला विकल्प आहे . कमी खर्चा मध्ये तुम्ही टेकनिकल शिक्षण घेऊ शकता. आणि Diploma चे शिक्षण घेतल्याने तुम्हाला लवकर नोकरी मिळू शकते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)