UPSC ESE Prelims Exam 2022 ची तारीख जाहीर; upsc.gov.in वर पाहा वेळापत्रक

युपीएससी (Union Public Service Commission) कडून UPSC ESE Prelims Exam 2022 ची तारीख जारी करण्यात आली आहे. स्टेज 1 परीक्षा 20 फेब्रुवारी 2022 दिवशी होणार आहे.

Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

युपीएससी (Union Public Service Commission) कडून UPSC ESE Prelims Exam 2022 ची तारीख जारी करण्यात आली आहे. स्टेज 1 परीक्षा 20 फेब्रुवारी 2022 दिवशी होणार आहे. दरम्यान जे विद्यार्थी Engineering Services Examination 2022 ला सामोरे जाणार आहेत त्यांना युपीएससीची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर टाईम टेबल पाहता येणार आहे.

प्रिलिम परीक्षा दोन शिफ्ट मध्ये होणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी 10 ते 12 या वेळेत असेल तर दुसरी शिफ्ट ही दुपारी 2 ते 5 या वेळेत असणार आहे. पहिल्या शिफ्ट मध्ये विद्यार्थ्यांना जनरल स्टडीज आणि इंजिनियरिंग अ‍ॅप्टिट्युट पेपर द्यावा लागणार आहे त्यासाठी 2 तासांचा वेळ असेल. तर 200 मार्कांची प्रश्नपत्रिका असणार आहे.

दुसर्‍या शिफ्ट मध्ये कम्प्राईज ऑफ सिव्हिल, मॅकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रोनिक आणि टेलिकॉम इंजिनियरिंग हे विषय असणार आहेत. ही परीक्षा 3 तासांची असेल त्यासाठी 300 मार्कांची प्रश्नपत्रिका असेल. इथे पहा वेळापत्रकाची डिरेक्ट लिंक! 

दरम्यान याकरिता 22 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर 2021 पर्यंत रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या नोकरभरतीद्वारा 247 जागांवर नोकरीची संधी आहे. तर 8 जागा या Persons with Benchmark Disabilities, 6 जागा Leprosy cured, Dwarfism, Acid Attack victims आणि Muscular Dystrophy उमेदवारांसाठी आणि 2 जागा Hard of Hearing उमेदवारांसाठी असणार आहेत. हे देखील नक्की वाचा: MHADA Admit Card 2021-2022: म्हाडा परीक्षेसाठी हॉलतिकीट्स जारी; mhada.gov.in वरून अशी करा डाऊनलोड .

उमेदवारांना परीक्षा सुरु होण्यापुर्वी  15 दिवस यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा प्रवेशपत्र २०२२ डाउनलोड करता येईल. त्यासाठी तुम्हांला वेळोवेळी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अपडेट्सवर लक्ष द्यावं लागणार आहे.

 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now