UPSC ESE Prelims Admit Card 2022: यूपीएससी च्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेचं प्रवेशपत्र upsc.gov.in वरून असं करा डाऊनलोड!

ही प्रिलिम परीक्षा यावर्षी दोन शिफ्ट मध्ये होणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी 10 ते 12 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 2 ते 5 मध्ये असणार आहे.

UPSC Representational Image (Photo Credits: PTI)

Union Public Service Commission कडून UPSC ESE Prelims Admit Card 2022 जारी करण्यात आले आहे. 31 जानेवारीपासून Engineering Services Prelims examination चे उमेदवार त्यांची अ‍ॅडमीट कार्ड्स डाऊनलोड करू शकणार आहेत. UPSC ची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in या संकेतस्थळावर हे ई अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करण्याची सोय आहे. दरम्यान 20 फेब्रुवारी 2022 पर्यंत उमेदवारांना त्यांचं अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करण्याची सोय आहे.

स्टेज 1 परीक्षा यंदा 20 फेब्रुवारी दिवशी होणार आहे. ही प्रिलिम परीक्षा यावर्षी दोन शिफ्ट मध्ये होणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी 10 ते 12 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 2 ते 5 मध्ये असणार आहे. या परीक्षेला सामोर्‍या जाणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांचं अ‍ॅडमीट कार्ड खालील दिलेल्या स्टेप्सप्रमाणे डाऊनलोड करता येईल. हे देखील नक्की वाचा:  UPSC ESE Prelims Exam 2022 ची तारीख जाहीर; upsc.gov.in वर पाहा वेळापत्रक.

 UPSC ESE Prelims Admit Card 2022 कसं कराल डाऊनलोड

युपीएससी या नोकरभरतीच्या माध्यमातून सुमारे 247 जागांवर नोकरभरती करणार आहे. यामध्ये 8 जागा या या Persons with Benchmark Disabilities, 6 जागा Leprosy cured, Dwarfism, Acid Attack victims आणि Muscular Dystrophy उमेदवारांसाठी आणि 2 जागा Hard of Hearing उमेदवारांसाठी असणार आहेत.