University of Mumbai First Merit List: पदवी प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाची पहिली यादी आज होणार mu.ac.in वर जाहीर

तुमचं नाव पहिल्या यादी मध्ये असेल आणि तुम्हांला तो प्रवेश निश्चित करायचा असेल तर तुम्हांला पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यामध्ये पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना वैयक्तिक महाविद्यालयांनी नमूद केलेल्या वेळेत कागदपत्रांची पडताळणी आणि शुल्क भरावे लागेल.

University of Mumbai First Merit List: पदवी प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाची पहिली यादी आज होणार  mu.ac.in  वर जाहीर
Mumbai University | (Photo Credits: mu.ac.in)

University of Mumbai कडून आज डिग्री साठीच्या अ‍ॅडमिशनसाठी पहिली गुणवत्ता यादी (First Merit List) सादर केली जाणार आहे. आज 27 मे संध्याकाळी 5 वाजता ही यादी जाहीर होणार आहे. 2025-26 साठी पदवीचं शिक्षण घेण्याची इच्छा असणार्‍या 850 मुंबई विद्यापीठाच्या संलग्न कॉलेज, ऑटोनोमस संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. 8 मे पासून सुरू झालेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत, मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. एकूण 2,53,370 विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व प्रवेशासाठी नोंदणी केली आहे, विविध पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी 8,11,643 अर्ज सादर केले आहेत.

प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 आणि महाराष्ट्र सरकारच्या 20 एप्रिल 2023 च्या निर्देशानुसार आयोजित केली जात आहे. यामध्ये 3 वर्षांचे पदवी प्रोग्राम, 4 वर्षांचे Honours and Honours with Research programs आणि 5 वर्षांचे integrated programs आहेत जे अनेक प्रवेश आणि एक्झिटचे पर्याय देतात.

Mumbai University First Merit List 2025 कशी पहाल ऑनलाईन?

  • मुंबई विद्यापीठाची वेबसाईट mu.ac.in ला भेट द्या.
  • होम पेज वर “Admissions 2025–26” किंवा “First Year Degree College Merit List.” चं बॅनर असलेली लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • सार्‍या affiliated colleges ची यादी दिसेल. तुम्ही जिथे अ‍ॅडमिशन साठी अर्ज केला आहे ते कॉलेज निवडा.
  • त्या कॉलेजच्या First Merit List (2025) च्या लिंक वर क्लिक करा.
  • मेरीट लिस्ट मध्ये तुमचं नाव शोधा.
  • यादीसोबत, कॉलेज कडून कागदपत्र पडताळणी, शुल्क भरणे आणि अंतिम प्रवेशाचे वेळापत्रक याची माहिती दिलेली असेल. वेळेची आणि आवश्यक कागदपत्रांची नोंद करा.

तुमचं नाव पहिल्या यादी मध्ये असेल आणि तुम्हांला तो प्रवेश निश्चित करायचा असेल तर तुम्हांला पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यामध्ये पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना वैयक्तिक महाविद्यालयांनी नमूद केलेल्या वेळेत कागदपत्रांची पडताळणी आणि शुल्क भरावे लागेल.

(The above story first appeared on LatestLY on May 27, 2025 09:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).