UGC NET Admit Card 2025: यूजीसी एनईटी 27 जूनच्या परीक्षेसाठी अ‍ॅडमीट कार्ड्स जारी; ugcnet.nta.ac.in वरून करा डाऊनलोड

UGC NET परीक्षा 25 ते 29 जून दरम्यान होणार आहे. उर्वरित परीक्षा दिवसांचे प्रवेशपत्र नंतर प्रसिद्ध केले जातील.

UGC NET Admit Card 2025: यूजीसी एनईटी 27 जूनच्या परीक्षेसाठी अ‍ॅडमीट कार्ड्स जारी; ugcnet.nta.ac.in  वरून करा डाऊनलोड
Online Student | Pixabay.com

National Testing Agency कडून 27 जूनला होणार्‍या University Grants Commission National Eligibility Test (UGC NET) ची अ‍ॅडमिट कार्ड्स जारी करण्यात आली आहेत. दरम्यान जारी अ‍ॅडमीट कार्ड्स ugcnet.nta.ac.in वर पाहता येणार आहे. यापूर्वी यूजीसी ने 25,26 जून दिवशीच्या परीक्षांची अ‍ॅडमिट कार्ड्स जारी केली आहे.

UGC NET परीक्षा 25 ते 29 जून दरम्यान होणार आहे. उर्वरित परीक्षा दिवसांचे प्रवेशपत्र नंतर प्रसिद्ध केले जातील. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिली शिफ्ट सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असेल. एजन्सीने सर्व परीक्षा दिवसांसाठी exam city intimation slips देखील जारी केल्या आहेत.

Exam city intimation slips मध्ये उमेदवारांना त्यांचे परीक्षा केंद्र कुठे असतील हे कळवण्यात आले होते. प्रवेशपत्रांवर, उमेदवारांना त्यांच्या परीक्षा केंद्रांचे नाव आणि पत्ता दिलेला असेल. नक्की वाचा: UGC NET Admit Card 2025: नेट 2025 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी; 3 तासांच्या परीक्षेचा 'कसा' असेल पॅटर्न? जाणून घ्या. 

UGC NET June 2025 चं अ‍ॅडमिड कार्ड कसं कराल डाऊनलोड

  • ugcnet.nta.ac.in वर क्लिक करा.
  • होम पेजवर, UGC ENT जून 2025 प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  • login credentials टाका.
  • अ‍ॅडमीट कार्ड पाहून डाऊनलोड करा.

प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या वैयक्तिक तपशीलांमध्ये काही त्रुटी असल्यास, उमेदवारांनी ताबडतोब एनटीए हेल्पलाइनशी संपर्क साधावा आणि एजन्सीला त्याबद्दल माहिती द्यावी.

(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2025 11:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).