
UGC NET Admit Card 2025: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने UGC NET 2025 साठी प्रवेशपत्र जारी केले आहे. ही परीक्षा 25 ते 29 जून दरम्यान घेतली जाईल. ही परीक्षा देशभरातील 85 विषयांसाठी घेण्यात येणार आहे. सर्व उमेदवार आता ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्रात उमेदवाराचे नाव, विषय, रोल नंबर, परीक्षा केंद्राचा पत्ता, परीक्षेची तारीख आणि वेळ आणि महत्त्वाच्या सूचना असतात. डुप्लिकेट प्रवेशपत्र परीक्षा केंद्रावर स्विकारले जाणार नाही.
NET Exam 2025 प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?
- अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in वर जा
- होमपेजवरील “प्रवेशपत्र डाउनलोड करा” लिंकवर क्लिक करा
- तुमचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा
- तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल, ते डाउनलोड करा
- परीक्षेत वापरण्यासाठी त्याची प्रिंटआउट घ्या (हेही वाचा - UPSC Pratibha Setu Initiative: यूपीएससीचा प्रतिभा सेतू उपक्रम; अंतिम यादीत स्थान न मिळालेल्या 10,000 हून अधिक उमेदवारांसाठी दुसरी संधी, जाणून घ्या काय आहे योजना)
UGC NET 2025 परीक्षा -
पेपर 1: 50 प्रश्न, 100 गुण (अध्यापन/संशोधन अभियोग्यता, तर्क, सामान्य जागरूकता)
पेपर 2: 100 प्रश्न, 200 गुण (विषय विशिष्ट ज्ञान)
वेळ: एकूण 3 तास (कोणताही ब्रेक राहणार नाही)
सर्व प्रश्न अनिवार्य असतील आणि परीक्षा पूर्णपणे संगणक आधारित असेल.
भारतातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि कनिष्ठ संशोधन फेलोशिप (JRF) साठी पात्रता निश्चित करण्यासाठी UGC NET परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण होऊन, उमेदवार अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात करिअर करू शकतात.