UGC Academic Calendar 2020-21: 1 नोव्हेंबर पासुन सुरु होणार FY पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे वर्ग, मार्च-ऑगस्ट मध्ये परिक्षा, पहा वेळापत्रक

केंद्रीय शिक्षणमंंत्री रमेश पोखरियाल निशंंक (Ramesh Pokhriyal Nishank) यांंनी आज ट्विट करुन पदवी (Under Graduate) व पदव्युत्तर (Post Garduate) विद्यार्थ्यांच्या प्रथम शैक्षणिक वर्षाची सुरुवात, परिक्षा, सुट्ट्यांविषयी सविस्तर माहिती देणारे वेळापत्रक जाहीर केले आहे.

Representational Image (Photo Credits: PTI)

केंद्रीय शिक्षणमंंत्री रमेश पोखरियाल निशंंक (Ramesh Pokhriyal Nishank) यांंनी आज ट्विट करुन पदवी (Under Graduate) व पदव्युत्तर (Post Garduate) विद्यार्थ्यांच्या प्रथम शैक्षणिक वर्षाची सुरुवात, परिक्षा, सुट्ट्यांविषयी सविस्तर माहिती देणारे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्राप्त माहितीनुसार, विद्यापीठाच्या पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या प्रथम वर्षासाठी शैक्षणिक वेळापत्रक संदर्भातील विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) केलेल्या मार्गदर्शक सूचना समितीचा अहवाल स्वीकारला आहे.तसेच या संपूर्ण सत्रासाठी 30.11.2020 पर्यंतच्या सर्व प्रवेश रद्द / स्थलांतर केलेल्या विद्यार्थ्यांंच्या फीचा परतावा केला जाईल असेही पोखरियाल यांंनी म्हंंटले आहे.

शिक्षणमंत्र्यांंच्या माहितीनुसार पदवी व पद्व्युत्तर शिक्षणाचे प्रथम वर्षाचे प्रवेश हे 31 ऑक्टोबर पर्यंत पुर्ण करुन 1 नोव्हेंबर पासुन वर्ग सुरु केले जातील. तसेच प्रथम वर्ष पहिल्या सेमिस्टर च्या परिक्षा मार्च महिन्यात घेतल्या जातील.यानंंतर केवळ एक आठवड्याचा ब्रेक देउन पुन्हा एप्रिल पासुन दुसर्‍या सेमिस्टरचे वर्ग सुरु करण्यात येतील. दुसर्‍या सेमिस्टरसाठी ऑगस्ट महिन्यात परिक्षा घेऊन पुढील वर्षाचे (द्वितीय वर्षाचे) वर्ग पुन्हा ऑगस्ट पासुन सुरु केले जातील जेणेकरुन नियमित वेळेत पुढील वर्षाचे शैक्षणिक वर्ष प्लॅन केले जाईल.

FY UG/PG TimeTable

(Photo Credits: Ramesh Pokhriyal)

रमेश पोखरियाल ट्विट

दरम्यान, बारावीच्या निकालानंंतर मुंंबई विद्यापीठाची मेरिट लिस्ट व कॉलेज प्रवेश प्रक्रिया सुरु आहेत. येत्या महिन्यात ही सर्व प्रक्रिया पुर्ण करण्यात येणार आहे. तर अकरावी च्या प्रवेशप्रक्रिया सुद्धा सुरु आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif