SSC-HSC Exam: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता बोर्डाच्या परीक्षेत होम सेंटर बंद, शिक्षण विभागाकडून विशेष नियामावली जारी

परिक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना इतर परिक्षा केंद्रावर जावून परिक्षा द्यावी लागणार आहे. म्हणजेचं कोव्हिड पूर्वी ज्या प्रमाणे दहावी बारावीच्या परिक्षा व्हायच्या त्याचं पध्दतीनुसार परिक्षा घेण्यात असल्याच्या सुचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

Representational Image (Photo Credits: PTI)

दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परिक्षा म्हणजे आयुष्यातील महत्वाचा टप्पा. विद्यार्थी जिवनात दहावी आणि बारावी परिक्षेला विशेष महत्व आहे. मोठे झाल्या नंतर ही परिक्षा किंवा या परिक्षेचे गुण कधी नोकरीत बढती मिळवण्यासाठी किंवा वाढीव पगार मिळण्यास कामात येत नसले तरी मात्र प्रत्येक विद्यार्थ्यावर किंवा त्याच्या पालकांवर या परिक्षेचा वेगळा ताण असतो. तरी गेल्या दोन वर्षांपासून मात्र या परिक्षेचं स्वरुप थोड बदललं आहे. २०२० ते २०२२ ज्या दरम्यान कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगभरात टाळेबंदी झाली होती. व्यवसाय, उद्योगांप्रमाणे शिक्षण संस्थेवर देखील याचा मोठा परिणाम झाला होता. तरी विद्यार्थ्यांची सुरक्षा बघता कोरोना दरम्यान शिकवणी वर्ग ऑनलाईन घेण्यात आले. एवढचं नाही तर दरम्यान काही परिक्षा देखील ऑनलाईन घेण्यात आल्यात किंवा परिक्षांच्या नियमांमध्ये जरा बदल करण्यात आले.

 

कोरोना महामारी दरम्यान दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परिक्षेचा पेपर ८० नाही तर एकूण ६० गुणांचा होता. तर यासाठी वेळही अडीचं तास नाही तर फक्त दोन तास वेळ होता. तसेच विद्यार्थ्यांना परिक्षा देण्यासाठी इतर कुठल्या परिक्षा केंद्रावर जायची गरज नसुन विद्यार्थ्यांना होम सेंटरवरुनचं परिक्षा देण्याची मुभा होती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभुमिवर हा निर्णय घेण्यात आला होता. तरी आता मात्र कोव्हिडीचा धोका टळल्याने शिक्षण विभागाकडून बोर्डाच्या परिक्षेच्या नियमांत मोठे बदल करण्यात आले आहे. (हे ही वाचा:- Jalna News: शिक्षकाची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी असं काही केलं की.. ऐकुन तुम्हीही व्हाल थक्क)

दहावी आणि बारावीच्या परिक्षेचा पेपर आता पूर्वीप्रमाणे एकूण ८० गुणांचा असणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना दोन तास आणि ३० मिनिटांचा वेळ दिल्या जाईल. तरी सर्वात मोठा बदल म्हणजे आता विद्यार्थ्यांना होम सेंटरवरुन परिक्षा देता येणार नाहीये. परिक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना इतर परिक्षा केंद्रावर जावून परिक्षा द्यावी लागणार आहे. म्हणजेचं कोव्हिड पूर्वी ज्या प्रमाणे दहावी बारावीच्या परिक्षा व्हायच्या त्याचं पध्दतीनुसार परिक्षा घेण्यात असल्याच्या सुचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.