सोलापूर विद्यापीठाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ असा नामविस्तार; राज्य सरकारचा निर्णय

ही आगामी निवडणुकीच्या तोंडावर ही नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराची खेळी खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर, दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने झालेल्या नामविस्ताराच्या निर्णयाचे धनगर समाजाकडून स्वागत करण्यात आले आहे.

Punyashlok Ahilyabai Holkar Solapur University, Solapur | | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Name of Solapur University Extension: सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराची प्रदीर्घ काळापालून होत असलेली मागणी अखेर राज्य सरकारने निवडणुकीच्या तोंडावर पूर्ण केली आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या मंगळवारी (5 मार्च 2019) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मैंत्रिमंडळ बैठकीत सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार करण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार यापूढे सोलापूर विद्यापीठ हे ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर’ (Punyashlok Ahilyabai Holkar Solapur University, Solapur) या नावाने संबोधले आणि ओळखले जाईल.

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन धनगर समाजात राज्य सरकार आणि खास करुन भारतीय जनता पक्षाबाबत प्रचंड नाराजी आहे. ही आगामी निवडणुकीच्या तोंडावर ही नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराची खेळी खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर, दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने झालेल्या नामविस्ताराच्या निर्णयाचे धनगर समाजाकडून स्वागत करण्यात आले आहे.

सोलापूर विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी होत होती. मात्र, विद्यापीठाचा ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर’ असा नामविस्तार केल्याने ही मागणी आता मागे पडली आहे. सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वर महाराजांचे नाव देण्यात यावे यासाठी शिव विरशैव संघटनेने राज्यभारात आंदोलन सुरु केले होते. तर, या विद्यापीठाला अहिल्याबाईंचेच नाव मिळावे यासाठी धवगर समाज प्रचंड आक्रमक होता. (हेही वाचा, Dhangar Reservation: धनगर समाज जल्लोष केव्हा करणार? प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणतात 'तारीख सांगणार नाही')

दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय घेतला खरा. पण, त्याला आक्षेप घेत शिवा अखिल भारतीय विरशैव युवक संघटनेने उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करुन आव्हान दिले. या नामविस्ताराबाबत सुरु असलेला वाद उच्च न्यायालयात आगोदरच प्रलंबित असताना मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या निर्णयाबाबत न्यायालय काय निर्णय देते हे पाहावे लागणार आहे. या याचिकेवर आज (बुधवार, 6 मार्च) तातडीने सुनावणी घेतली जाणार आहे.